🔹हंपी येथील विठ्ठल मंदिर🔹


हंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर…

पंढरपूर च्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवरायानी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले व अशी अख्यायिका आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपीला घेऊन या रथामध्ये स्थापन केली …
परंतु स्वप्नात विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला व परत पंढरपूररात ठेवण्याची आदेश दिला…
http://bit.ly/36Na7RO
नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही आजही पंढरपूर च्या विठ्ठलाच्या प्रतिक्षेत हे मंदिर उभं आहे सोलापूर शहरापासून फक्त 350 कि मी वर हंपी शहर आहे
१५ व्या शतकातील या मंदिराला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळाला आहे.
विठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ… पोकळ नसून त्यातून आजही ‘सरगम’चा निनाद
हे विठ्ठल मंदिर “कर्नाटकाच्या हम्पी या गावात आहे ..अतिशय सुंदर आणि हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
तुंगभद्रेच्या काठावर वसलेल्या कर्नाटकातील हंपीतील विठ्ठल मंदिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना आहे
विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराचे बांधकाम द्रविडी शैलीतील आहे. मंदिराच्या चाहु बाजूंना उंच तटबंधी आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करताच आपण वेगळ्याच जगात पोहोचल्याचा भास होतो.
मंदिरात एकामागे एक चार पीठ आहेत. रथ पीठ, ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन. आपली घरात पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावन असायचे ते कदाचित याच द्रविडी शैलीचा एक भाग होते. रथ पीठ म्हणजे दगडी रथ. त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत. हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे. या दगडी रथाची चाके फिरून त्यामधून भगवान गरुड विष्णूला वंदन करायला जातात,
मंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत पाकगृह मंडप, भजनगृह मंडप, पांडुरंग-रखुमाई कल्याण मंडप आणि मध्यभागी महामंडप. कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जाई. त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ, संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नाहीत. असे अजूनही त्या स्तंभांमधून आजही ‘सारेगामापाधानिसा’चा निनाद ऐकू येतो.
मध्यभागी असलेल्या महामंडपात विठ्ठल मंदिर आहे. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात पूर्वी विठ्ठलाची मूर्ती होती.
आज ती तिथे नाही. आता ती मूर्ती महाराष्ट्रातील पंढरपुरात आहे असे तेथील लोकांनी सांगितले. मूर्ती तेथे नसली तरी मंदिराचे पावित्र्य आजही जपलेले आहे. ‘पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती’ या ओवीची प्रचीती आजही त्या महामंडपात येते. मुख्य गाभाऱ्याच्या बाजूने एक छुपा प्रदिक्षणा मार्ग आहे. तो केवळ राज घराण्यातील लोकांसाठी मर्यादित होता.
कृष्ण देवा रायाच्या वर्षातून एकदा विठ्ठलाची महा पूजा होत असे. त्यावेळी राजा कृष्ण देवारायाची राणी चेन्नम्मा या महामंडपात नृत्य सादर करत असे. त्या वेळेस दूर देशीतून कलाकार आपली कला सादर करण्यास यायचे.
महामंडपात चीनी सुमो करताना कोरलेले आढळतात. मंडपाबाहेर पोर्तुगीज, चीनी अशा परदेशी लोकांची शिल्पे आहेत. म्हणजे १५ व्या शतकात सुद्धा इतक्या दूर लोक येत असत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिला फौजींची शिल्पे आहेत, एक महिला वाघाशी लढत आहे तर दुसऱ्यात युद्धात लढणारी स्त्री दिसते. विजयनगरच्या सैन्यात स्त्रियांनाही प्रवेश होता हे पाहून आश्चर्य वाटते.
महामंडपाच्या मागील बाजूस देवी लक्ष्मीचे मंदिर आहे. हिंदू पुराणाप्रमाणे माता लक्ष्मी ही भगवान विष्णुंची सहचारणी होती. मंदिर परिसरात कित्येक शीला लेख आढळतात. मंदिरात वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही.आपल्या विठोबासाठी बांधलेले इतके उत्कृष्ट मंदिर पाहून डोळे धन्य होतात. आपल्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलावर कर्नाटकामध्येही पूर्वीपासून असलेली श्रद्धा, भक्ती पाहून डोळे पाणावतात. आणि नकळत ओळी आठवतात
‘कानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु

हंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম