गुजराती माणुस सैन्यात का जात नाही

 गुजराती माणुस सैन्यात का जात नाही




गुजराती माणुस सैन्यात का जात नाही हा प्रश्न अनेकांना पडला असेल. सुरूवातीला मलाही हा प्रश्न पडला होता.याचे उत्तर शोधण्यासाठी मी अनेक पुस्तके पालथी घातली.इंटरनेटवर सर्च केले,इंग्रजी,मराठी,हिंदी भाषेतील तसेच अनुवादित पुस्तके चाळली.व मला जे सापडले ते तुमच्यापुढे ठेवत आहे.

गुजराती माणुस सैन्यात का जात नाही

भारतीय समाजात विविध घटक हे विविध क्षेत्रात निपुण आहेत. जसे गुजराती/मारवाडी /पारसी उद्योग धंद्यात, तामीळ/कन्नड/तेलुगू संशोधन आणि तंत्रज्ञान, बंगाली लोक सुद्धा शास्त्रज्ञ आहेत, बिहार आणि उत्तर प्रदेश नोकरशाही तर महाराष्ट्र आणि पंजाब संरक्षण क्षेत्रात पुढे आहे.सैन्य भरतीवेळी भारतीय सैन्यात कोणत्या राज्यातून किती सैनिक घ्यायचे हे सैन्यदले ठरवतात - ते लोकांच्या भरती होण्याच्या इच्छेवर अवलंबून नाही. भारतीय सैन्यदले स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत. त्यामुळे काही त्यांच्या काही प्रक्रिया ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या आहेत - आणि तशा पाळल्या जातात. भारतात १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध का अयशस्वी झाले याचा कृपया शोध घ्या. पंजाबात महाराज रणजितसिंहाचे राज्य ब्रिटिशांनी फूट पाडून ताब्यात घेतले, त्यानंतर अनेक शीख सेनानी ब्रिटिशांशी एकनिष्ठ होते. १८५७ च्या युद्धाच्या वेळी पंजाबातून ४०००० सैनिकांची मोठी कुमक जनरल लॉरेन्स च्या नेतृत्वाखाली युद्धात उतरवून ब्रिटिशांनी या युद्धाचे पारडे फिरवले. तेव्हापासून ब्रिटिशांचा पंजाबवर अधिक विश्वास ठेवण्याचे धोरण होते. त्यामुळे परंपरेने भारतीय सैन्यदलांत सर्वाधिक भरती पंजाबातून केली जाते.सध्याच्या काळात गुजरातमध्येही भरती कॅम्प घेतले जातात, त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळतो आणि पूर्ण भरती होते.अर्थशास्त्र सांगते की,ज्या प्रांतात रोजगार कमी प्रमाणात असतो व योग्य शारिरीक क्षमता असणारे लोक असतात व जीवन जगायची कृषी सोडून इतर स्किल्स येत नसतात अश्या प्रांतातील लोक सैन्यात जास्त दिसतात.ज्यू लोक व्यापारात वर्चस्व राखून आहेत. ज्यू धनाढ्यांचा दबाव गट अमेरिकेत कार्यरत आहे. इस्राएल चे स्वतंत्र राष्ट्र यांच्याच अर्थपूर्ण सहकार्याने स्थापन झाले.वाघेला आणि जडेजा हे दोन गुजरात च्या सैन्य परंपरेला साजेसे आहे.बाकीच्यांनी व्यापारी आणि नोकरीचा पेशा पत्करला. पण त्यामुळे त्यांच्या देशभक्तीला आव्हान देणे चुकीचे आहे.व्यापारी हा सुद्धा देशाचा कणा आहे.हे विसरून चालणार नाही.इंग्रज सुध्दा व्यापारी होते.आज अरब देशांकडे बघा, पैसा आहे पण सेना अमेरिकेची वापरायला लागते. उद्या तेल संपल्यावर स्वतःच्या देशात उद्योग कसे होतील याचा ते विचार करीत आहेत. व्हेनेझुएला बघा, भरपूर तेल आहे पण व्यापारी नाहीत तशीच काहीशी गत रशिया मध्ये पण आहे भरपूर तेल, गॅस आहे, सेना सुद्धा खूप सशक्त आहे पण विकण्यासाठी उद्योगी मन नाही.जसे प्रत्येकाने वेगवेगळा पेशा पत्करला तरच देशाची घडी मजबूत होते.उदया प्रत्येकजण सैन्यात जाऊ लागला तर...? विचार करून पहा.गुजरातमध्ये जैन हा अहिंसक - काहीसा अति कर्मठ अहिंसक पंथ आहे. मोठ्या प्रमाणात व्यापाराचे संस्कार वातावरण आहे. हे खरे आहे. पण काही उत्तरांत म्हटल्याप्रमाणे गुजराती लोक भित्रे असतात / त्यांना नफा नुकसानीपलीकडे काही दिसत नाही ही विधाने वास्तवदर्शी नाहीत - विचारांची अपरिपक्वता दाखवतात.

इतिहास पाहिला तर,आठव्या शतकात गुजरातमध्ये नवसारीनजीक झालेल्या एका मोठ्या युद्धात चालुक्य आणि गुर्जर प्रतिहार राजांच्या सैन्याने आक्रमणकारी अरब सैन्याला जबरदस्त दणका दिला होता. त्यापुढे चार शतके इस्लामी सैन्यांनी सिंधच्या पुढे जाण्याचे टाळले होते. गुजरातमध्ये वेगवेगळ्या राजपूत समूहांची मोठी संख्या आहे. खिलजीपासून विविध मुस्लिम आक्रमणांमुळे गुजरातमध्ये इस्लामी अत्याचारांचा वरवंटा काही शतके फिरत होता. तरीही सोलंकी, जाडेजा, परमार ही राजघराणी आपापली राज्ये सांभाळून होती. हे दिसुन येते.

आपण सगळे भारतीय आहोत आणि देशसेवा ही फक्त लढून केली जाऊ शकते असे नाही.’सैन्यात जात पात धर्म नसतो! सैन्यातला प्रत्येकजण हा फक्त हिंदुस्तानी असतो!’ एखादा सैन्यात नसेल तर त्याला देशभक्तीच नाही, किंवा तो धाडसी नाही, हावरा आहे असे समजणे हे फारच चुकीचे आहे. कोणाच्या पेशावरून, जाती वा धर्मावरून त्याची देशभक्ती मोजणे हे निंदनीय आहे.गुजराती व्यापारी असला तरी त्याचे व्यापार कार्य दुर्लक्षुन चालणार नाही.

गुजराती बांधवांचा पिंडच व्यापारी आहे. पिढीजात व्यापारी समाज म्हणूनच त्यांची ओळख आहे.जशी मराठा,रजपूत म्हटले की इतिहासापासून ही लढवय्यी जात म्हणुन आोळख होती व आहे.भारतीय सैन्यात गुजराती टक्का थोडा कमी आहे,पण गुजराती "व्यापारी" म्हणुन हेटाळणे बरोबर नाही.

-माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

9890875498

दि २२ जुलै २०२१

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম