नवरदेवाला स्मशानभुमीत पोशाख : या गावची अजब प्रथा
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात डुबेरे हे गाव आहे.हे गाव पेशव्यांचे आजोळ म्हणून प्रसिद्ध आहे. या शिवाय एका आगळया वेगळया प्रथेबद्दल हे गाव प्रसिद्ध आहे. या गावातील मुलीचे लग्न ठरल्यास येणाऱ्या नवरदेवांना गावाच्या स्मशानभूमीतच लग्नाचा पोशाख घालावा लागतो. या गावात या पोशाखाला ‘शेवंती’ चढविणे असे म्हणतात. हा पोशाख घातल्यानंतर स्मशानात नतमस्तक होऊन पुढे गावात मिरवणूक काढली जाते.आजपर्यन्त ही प्रथा मोठ्या भक्तिभावाने पाळली जाते.
या प्रथेविषयी आधिक माहिती अशी की, या गावापासून जवळच बारागावपिंप्री हे गाव आहे.या गावाची दोन गावे झाली आहेत. या गावात म्हणे हजारो वर्षांपूर्वी एक दांपत्य येथे वास्तव्याला आले. त्यांचा कुंटुंबकबिला विस्तारला,भाऊबंदकिचे गट पडले.व ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. त्यातून पिंप्रीची विभागणी झाली.एका पिंप्रीला "मोठी पिंप्री" व दुसऱ्या पिंप्रीला "लहान पिंप्री" म्हटले जाऊ लागले.
लहान पिंप्री येथील एका महिलेचे, मोठ्या पिंप्रीतील विवाहित पुरूषावर प्रेम होते. पण हे प्रेमसंबंध गावात व समाजात मान्य नव्हते. तरीही त्या पुरूषाने महिलेबरोबर विवाह केला. पण मोठ्या पिंप्रीत (सासरी) तिला राहणे शक्य झाले नाही.लोक तिच्याशी फटकुन राहु लागले म्हणुन ती पुन्हा आपल्या गावी (माहेरी) राहू लागली.तेव्हापासून ती दुसरी बायको म्हणजेच पाठची म्हणून गावाला "पाटपिंप्री" असे नाव पडले.
मोठ्या पिंप्रीत परिसरातील बारा गावांचा बाजार भरू लागल्याने कालांतराने त्याचे नावही "बारागावपिंप्री" असे पडले. पाटपिंप्रीत धार्मिक विचारांचा पगडा होता. अशा एका काळात विध्वंसक प्रवृत्तीच्या दोन व्यक्ती उपद्रव देऊ लागल्या. विशेषत: लहान मुलांना त्यांचा मोठा जाच झाला. त्याच वेळी दैवी रूपाने या दोघांचा अंत केला. मात्र, मरते समयी त्यांनी प्रत्येक व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याआगोदर स्मशानात येऊन समाधीचे दर्शन घेईल तर त्यांना पुढील काळात त्रास होणार नाही अशी अखेरची इच्छा बोलून दाखविली. तेव्हापासून पिंप्रीत येणारा प्रत्येक नवरदेव आधी स्मशानात जातो, असे सांगितले जाते.
या कहाणी बरोबरच आणखीही एक कहाणी सांगितली जाते ती अशी की,भिकाबाबा म्हणुन एक दैवी पुरूष या गावात होते.ते आजारी व्यक्तिवर मोफत उपचार करीत असत,शिवाय आपल्या दैवी शक्तीचा जोरावर आजारी माणसांना बरे करीत असत.त्यांच्या पश्चात तेथेच स्मशानात त्यांचे मंदिर बांधले गेले. या गावातील माहेरवासिनी बरोबर जो पुरूष लग्न करेल त्याने अगोदर म्हणजे नवरदेवाने मंदिरात विवाहाचा पोशाख चढवायचा आणि मगच संसारीक जीवनाला सुरुवात करायची अशी प्रथा सुरू झाली.प्रथा मोडण्याचेही प्रकार घडलेत. परंतु ते अगदी बोटावर मोजण्याइतके. ज्यांनी प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला त्यांना योगायोगाने तेथेच वाईट अनुभव आल्याने प्रथेविषयीची अंधश्रद्धा गाढ भक्तीत रूपांतर झाली. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर हुंडा अथवा इतर मानपानांऐवजी स्मशानात कपडे घालण्याच्या प्रथेची अट सर्वप्रथम नवरदेवाकडच्या मंडळींना घातली जाते. जे नकार देतात, ते लग्न अर्थातच मोडते.
अशा या आगळया वेगळया गावात अजुनही ही प्रथा चालू आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498