‘जयसिंगपूर’
जयसिंगपूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक शहर आहे. शांत वातावरणासाठी ओळखले जाते.या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वडील राजा जयसिंग, यांच्या नावावरुन ठेवले आहे.हे शहर कोल्हापूरपासून ३८ किलोमीटर पूर्वेला रत्नागिरी-नागपूर राज्यमार्गावर ,वसलेले आहे.कोल्हापूर जिल्हा म्हणजे कृष्णा पंचगंगेच्या पाण्यामुळे सुपीक झालेला प्रदेश. विशेषतः शिरोळ तालुक्यात ऊसापासून ते भाजीपाल्या पर्यंत सगळ्याच दर्जेदार उत्पादन घेतल जात. पण त्या काळच्या करवीर संस्थानात मोठी बाजारपेठच नव्हती. या शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते व ही नदी कोल्हापूर , सांगली या जिल्ह्यांमधील सीमा बनते. येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या शहराची रचना एका वेगळ्या प्रकारची आहे. हे शहर तंबाखू, मिरची, गूळ व्यापारासाठी वसवले गेले.
कोण म्हणतं इथेपुर्वी जंगल होतं तर कोण म्हणतं माळरान होतं. पण इथच एक व्यापारी नगर वसलं.हे गाव म्हणजे जयसिंगपूर
याच बरोबर शेजारीच असलेया पटवर्धनांच्या संस्थानात सांगली शहर देखील हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाल होतं. कोल्हापूर या स्पर्धेत मागे पडत आहे हे शाहू महाराजांच्या अगदी तरुण वयातच लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी राज्यकारभार हाती आल्यावर आपल्या राज्यात व्यापारी पेठा वसवायला सुरवात केली. पहिली पेठ म्हणजे शाहूपुरी.याचच पुढचं पाऊल म्हणजे जयसिंगपूर ही व्यापारी पेठेची नगरी.
जयसिंगपूर म्हणजे शाहू महाराजांची स्वप्न नगरी होती. त्यांना हे शहर अतिशय आदर्शपणे उभं करायचं होतं. शाहू महाराजांच्या डोक्यात गावाचा आराखडा तयार होता. तो साकारण्यासाठी युरोपच्या आर्किटेक्टची मदत घेण्यात आली. अनेक नगर रचनाकार यांचा सल्ला घेतला. एक मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात छेदनाऱ्या अठरा गल्ल्यांचे हे टुमदार शहर वसवलं.हे साल होतं १९१६. शाहुरायांच्या जनक पित्याचा म्हणजेच कागलचे महाराज जयसिंगराव घाटगे याचं नाव या शहराला देण्यात आलं.
“जयसिंगपूर"
कोल्हापूर, सांगली, निपाणी कागल येथील व्यापाऱ्यांना खास सवलती देऊन वखारी घालण्यास प्रोत्साहन देण्यात आलं.
स्वच्छ व सुंदर हवामान. आसपासच्या खेड्यातून येणार दुधदुभत आणि ताजा भाजीपाला यामुळे व्यापाऱ्यांची वस्ती वाढली. आर्थिक व्यवहार वाढले. विशेषतः तंबाखू व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पेढ्या सुरु केल्या. ही पेठ हळूहळू भरभराटीस आली. संस्थानातील शेतमालास बाहेरच्या राज्यात जाण्याची गरज उरली नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,शाहू महाराजांनी केलेले सामाजिक प्रबोधनाच काम, त्यांनी शिक्षणाचा तळागाळातल्या समाजात प्रसार व्हावा यासाठी केलेले कष्ट, त्यांनी कुस्तीला मिळवून दिलेली राज्यमान्यता, त्यांनी उभारलेले धरणे यासगळ्याची आपल्याला माहिती असते.
मात्र शाहू महाराजांनी कोल्हापुरात व्यापारी क्षेत्रात केलेलं काम आपल्याला माहिती नसते.सांगली कोल्हापूरला जोडणाऱ्या मार्गावरील प्रमुख शहर म्हणून जयसिंगपूर उदयास आलं. या शहरात रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. जयसिंगपूरचा माल भारतभर पोहचवला जाऊ लागला. जवळ असलेल्या कर्नाटकातून निपाणी पेक्षा जयसिंगपूरला तंबाखूच्या सौद्यासाठी प्राधान्य मिळू लागल. १९४१सालच्या दरम्यान इथे नगरपालिका स्थापन झाली.स्वातंत्र्यानंतर जयसिंगपुरात अनेक उद्योगधंदे स्थापन झाले. . याच गावातील संजय घोडावत यांचा स्टार गुटखा तर प्रचंड लोकप्रिय होता.येथुन जवळच सांगली, मिरज ही शहरे असुन १५ किलोमीटर अंतरावर नरसिंहवाडी हे धार्मिक ठिकाण आहे. तर १८ किलोमीटर अंतरावर खिद्रापूर हे गाव असुन येथील कोपेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
Tags
BLOG