चर्चेतला माणुस : डॅशिंग नेता नितिन नांदगावकर

   चर्चेत असलेला माणुस : नितिन नांदगावकर 

         शिवसेनेचा डॅंशिग नेता 
__________________________
दि. २७ जुलै २०२०
नितिन नांदगावकराना कोण अोळखत नाही?  अख्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडी असणारं हे नावं. 
"जेथे मराठी माणसावर अन्याय होतो आहे, तेथे नितिन नांदगावकर असणारचं" नितीन नांदगावकर हे स्वत:ची ओळख राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता अशी करून देतात. सध्या ते शिवसेनेत आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्यावेळी ते मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
ते परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. परप्रांतीय रिक्षाचालकाला केलेली मारहाण असो की दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दिलेला दम असो, नांदगावकर कायमच फेसबुक व्हीडिओच्या माध्यमातून चर्चेत असतात.जय महाराष्ट्र, मी शिवसैनिक', या वाक्यानं नांदगावकरांच्या व्हीडिओची सुरुवात होते. नांदगावकर उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यासाठी ते अनेकदा हातात कायदाही घेतात आणि प्रसंगी हाणामारी करतात. उत्तर भारतीयांवर केलेली दादागिरी ते सोशल मीडियावर दाखवतात आणि त्यांचे व्हीडिओ व्हायरलही होतात.त्यांच्या कामाची स्टाईलच अशी आहे की देखते रहो. त्यांच्यावर अनेक केसेस झाल्या आहेत. पोलिसांनी त्यांना मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती.

नितीन नांदगावकर कायमच आक्रमक पद्धतीनं काम करत आले आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी रिक्षामधील मीटरमध्ये गडबड केल्यामुळे भाडे वाढवून घेणाऱ्या रिक्षाचालकाची रिक्षा फोडली होती. तसंच एकदा एका परप्रांतीय रिक्षावाल्याला मारहाणही केली होती. हे सगळे व्हीडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत."नितीन नांदगावकर सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी उभे राहतात. मग ते रिक्षा फोडणं असो की डॉक्टरला दम भरणं असो, जिथं लोकांची लुबाडणूक होते, तिथं नांदगावकर कायदा हातात घेतात. ऑन द स्पॉट प्रश्न निकाली जातात म्हणून त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळतो." अवास्तव भाडे आकारणाऱ्या, प्रवाशांवर दादागिरी करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना वठणीवर आणण्याचं काम नांदगावकर करत असतात. नांदगावकर हे दर बुधवारी सामान्य मुंबईकरांना भेटतात. केवळ रिक्षा आणि टॅक्सी चालकच नाही तर सामान्यांना फसवणाऱ्या बिल्डर, बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी यांच्याविरोधातही कारवाई करून सामान्य मराठी माणसाला त्यांनी न्याय मिळवुन दिला आहे. तरुणांमध्ये जबरदस्त फॅन फॉलोईंग असलेले नांदगावकर २०१० पासून सक्रिय राजकारणात आहेत.फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नासंबंधीचे,अवैधरित्या वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्याचे,फसवणुक करणाऱ्या आरोपींच्या मारहाणीचे,वयोवृद्धानां न्याय दिल्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत. सळसळत्या रक्ताने आणि जोशाने भरलेल्या तरुणाईचा सवयीप्रमाणे त्यांच्या या प्रयत्नांना उदंड प्रतिसादसुद्धा लाभला आहे. आपला ‘मसिहा’ भेटल्यामुळे अनेकजण दर बुधवारी एल्फिन्स्टच्या ‘महाराष्ट्र गडावर’ त्यांना भेटण्यासाठी गर्दीसुद्धा करतात. समाजकंटकांना पोलिस ठोकणार का मी ठोकू? असा बिनधास्त सवाल नांदगावकरच विचारू शकतात.सामान्य मराठी माणसाचे जे जे प्रश्न कायदयाने सुटत नाहित ते प्रश्न नांदगावकरानी आपल्या स्टाईलने सोडवुन मराठी जनमाणसात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. मुंबईत रोज रेल्वे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्मवरती टॅक्सी चालक आणि त्यांचे दलाल ट्रेन मध्ये जबरन घुसून महिला-पुरुष प्रवाशांना त्रास देत असतात. तसंच तेही बिना लायसेन्स, विना तिकीट, विना परवाना रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून बिनदास्त दिवस-रात्र आपले सावज शोधत असतात. अशाना नांदगावकरानी चांगलाच धडा शिकवला आहे. सोशल मीडियावर नितीन नांदगावकर यांचा एक चाहता वर्ग आहे. त्यांनी फेसबुकचा आधार घेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.टॅक्सीच्या मीटरमध्ये कशी फेरफार होते याचे प्रात्यक्षिक फेसबुकवर लाईव्ह दाखवले होते. रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी, यांसारखे अनेक विषय त्यांनी फेसबुकद्वारे लोकांसमोर आणले होते.
एकदा तर माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला होता. या प्रकरणी नितीन नांदगावकर यांच्यावर अॅन्टोप हील पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. 
कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखिल त्यांनी आपल्यातला माणुस दाखवुन दिला आहे. लाॅकडाऊन काळात गरीब लोकाना मदत असो, रूग्णाना वैधकीय मदत असो किंवा अॅम्बुलन्स पुरवणे असो. त्यांनी प्रत्येकवेळी आपला खिसा व मन मोकळे सोडले आहे. लाॅकडाऊन काळातली त्यांची मदत मुंबईतला माणुस कधिच विसरणार नाही. भूमिपूत्रांसह गरीबांच्या न्याय हक्कासाठी ते सदैव लढत असतात.  नांदगावकर हे कायम गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरताना सर्वांनी पाहिलं आहे. 
कोरोना लाॅकडाऊन काळात१७ जुलैला हिरानंदानी हॉस्पिटल येथे एक रिक्षाचालक मयत झाला होता. हाॅस्पिटल प्रशासन अवास्तव पैशाची मागणी करत होते. पण त्या रिक्षाचालक कुंटुबियाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पैसे भरलेशिवाय हाॅस्पिटलने  मृतदेह देण्यास नकार दिला. हि गोष्ट नांदगावकराना समजताच ते  हाॅस्पिटल मध्ये गेले व त्यांनी प्रशासनास जाब विचारला.आपल्या रांगडी मराठी भाषेत त्यांनी हाॅस्पिटल बरोबर वाद घातला.व रिक्षा चालकाचा मृतदेह कुंटुबियाना मिळवुन दिला. यासाठी त्यांचेवर पोलीस कारवाई पण झाली.धमकीचे फोन आले. 
सर्व सामान्य मराठी माणसाला "आपला माणुस" वाटणारे नितिन नांदगावकर यांच्यावर महाराष्ट्रातला तमाम मराठी माणुस भिस्त ठेऊन आहे. 
मला तर वाटते नांदगावकर साहेबानी मुब्ई बाहेर पण लक्ष देऊन तमाम मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवुन न्याय दयावा
अनिल पाटील पेठवडगाव, कोल्हापुर, No. 9890875498 


चर्चेतला माणुस : डॅशिंग नेता नितिन नांदगावकर,Man in the discussion: Nitin Nandgaonkar
__________________________=======================================================

Man in the discussion: Nitin Nandgaonkar
__________________________
mahiti seva Group Pethwadgaon
__________________________
         Dancing leader of Shiv Sena
__________________________
On July 27, 2020
Who doesn't know Nitin Nandgaonkar? This is a name that everyone in Maharashtra has.
Nitin Nandgaonkar introduces himself as a politician and social activist. He is currently in Shiv Sena. Earlier he was in Maharashtra Navnirman Sena. At that time, he was the General Secretary of MNS Transport Sena. He joined the Shiv Sena before the assembly elections last year.
They are known for their anti-alien role. Whether it is the beating of a foreign rickshaw puller or the beating of a doctor at a hospital, Nandgaonkars are always in the news through Facebook videos. Nandgaonkar is seen taking an aggressive stance against North Indians. For this, they often take the law into their own hands and fight on occasion. He shows the bullying of North Indians on social media and his videos go viral. His style of work is such that you keep watching. There have been several cases against him. Police had deported him from Mumbai and Palghar districts.
__________________________
mahiti seva Group Pethwadgaon
__________________________
Nitin Nandgaonkar has always been aggressive.
A few days back, he had broken into the rickshaw of a rickshaw puller who was raising fares due to a fault in the meter in the rickshaw. He had also beaten up a foreign rickshaw puller once. All these videos are available on social media. " . " Nandgaonkars are working to attract rickshaw and taxi drivers who charge unrealistic fares and bully passengers. Nandgaonkar meets ordinary Mumbaikars every Wednesday. He has brought justice to the common Marathi man by taking action against not only rickshaw and taxi drivers but also builders who cheat the common people and gangs making fake passports. Nandgaonkar, who has a huge fan following among the youth, has been active in politics since 2010. Through Facebook, he has uploaded many videos on public issues, punishing illegal drivers, beating accused of cheating and giving justice to the elderly. Their efforts have received overwhelming response, as is the habit of young people full of blood and enthusiasm. Many people even flock to Elphinstone's 'Maharashtra Fort' every Wednesday to meet their 'Messiah'. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, will the police beat the troublemakers? Nandgaonkar can ask such a simple question. Nandgaonkar has created his image in the Marathi people by solving all the questions of the common Marathi man which are not solved by law in his own style. Every day in Mumbai, taxi drivers and their brokers forcibly enter the train on the platform of the railway terminal and harass the male and female passengers. Also, without a license, without a ticket, without a license, they are looking for their belongings day and night. Ashana Nandgaonkar has taught a good lesson. Nitin Nandgaonkar has a fan base on social media. He has brought justice to the common man on the basis of Facebook. A demonstration of how the meter of a taxi changes was shown live on Facebook. He had brought many issues like rickshaws, taxi drivers' muzzles to the people through Facebook.
Shiv Sainik Nitin Nandgaonkar had once caught a man who had touched a woman in a wrong way at Matunga railway station. Antop Hill police had registered a case against Nitin Nandgaonkar in this regard.
They have shown us man even in times of epidemics like the Corona. Whether it is helping the poor during the lockdown, providing medical aid to the patient or providing an ambulance. He has left his pockets and mind free every time. The people of Mumbai will never forget his help during the lockdown. They are always fighting for the right of justice of the poor including Bhumiputras. Everyone has seen Nandgaonkar always taking to the streets to bring justice to the poor.
A rickshaw puller died at Hiranandani Hospital on July 17 during the Corona lockdown. The hospital administration was demanding unrealistic money. But the family of the rickshaw puller was not in a good financial position. The hospital refused to return the body without payment. As soon as Nandgaonkar came to know about this, he went to the hospital and asked the administration for an answer. Police action was taken against him for this. There were threatening calls.
All Marathi people in Maharashtra are relying on Nitin Nandgaonkar, who seems to be "your man" to all ordinary Marathi people.
I think Nandgaonkar Sahebani is out of Mumbai but paying attention to all the Marathi people Justice should be done by raising voice against injustice.
Anil Patil Pethwadgaon, Kolhapur, No. 9890875498
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম