मृत्युपूर्वी यमराज देतात हे चार अप्रत्यक्ष सुचना

 मृत्युपूर्वी यमराज देतात हे चार   अप्रत्यक्ष सुचना      

  ज्याला जीवन आहे त्याला मरण देखील आहे. हाच निसर्गाचा नियम आहे जो सर्वांसाठी सारखा आहे. आपलं शरीर हे नश्वर आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू/अंत देखील होतो. यातून कोणीही वाचू शकत नाही. पण कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्यापैकी कोणालाच ठावूक नाही. असं म्हणतात की मृत्यू पूर्वी यमराज आपल्याला काही संकेत देतात.    
यमराज आणि त्यांचा भक्त अमृत यांच्या एका प्राचीन कथे अनुसार कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यू पूर्वी यमराज त्या व्यक्तीला चार संकेत देतात. ज्यातून आपण याचा अंदाज बांधू शकतो की आपला शेवट आता जवळ आला आहे. ज्यामुळे ती व्यक्ती जगाचा निरोप घेण्याआधी त्याच्या अपूर्ण कामांना पूर्ण करू शकेल. माणूस जसा जसा वृद्धत्वाकडे वाटचाल करु लागतो तशा हळूहळू दिसणाऱ्या या खुणा आहेत. यामागे जीवशास्त्रीय कारणे आहेत._*
▪पहिला संकेत – केस पांढरे होणे
▪दुसरा संकेत – दात पडणे
▪तिसरा संकेत – डोळ्यांनी कमी दिसू लागणे.
▪चौथा संकेत – शरीराचे अवयव निष्क्रिय होणे.
म्हणजे हे वगळे सांगायला नको की यमराजाने संकेत दिले नाहीत तरी मृत्युपूर्वी, म्हणजे वृद्धत्व आल्यानंतर या खुणा दिसू लागतात. आपला मृत्यू जवळ आला आहे हे सांगण्यासाठी यमराज असावेतच आणि त्यांनी संकेत द्यावेतच याची गरज नाही.
  माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

मृत्युपूर्वी यमराज देतात हे चार  अप्रत्यक्ष सुचना

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম