फेसबुक लिंक http://bit.ly/3fvd6Cl
पेयजलाची समस्या केवळ आपल्याच देशाला नव्हे तर जगभरात अनेक देशांना भेडसावत असते.
आता ही पाण्याची समस्या सोडवण्यासाठी बेल्जियम मधल्या संशोधकांनी एक वेगळे तंत्र तयार केले आहे. चक्क मानवी मूत्रापासून शुद्ध पिण्याचे पाणी त्यांनी बनवले आहे.
बेल्जियममधल्या एका विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी मूत्रापासून शुद्ध, पिण्यायोग्य पाणी तयार करणारं यंत्र शोधून काढले आहे. विद्यापीठात 10 दिवस चाललेल्या वार्षिक समारंभात या मशिनचा वापर करण्यात आला. यावेळी गोळा करण्यात आलेल्या मूत्रापासून 1 हजार लीटर शुद्ध पाणी तयार करण्यात आले. विशेष म्हणजे अत्यंत सोपी प्रक्रिया आणि सौरऊर्जेचा वापर करून मुत्रापासून पाणी वेगळे करणे शक्य झाले आहे. ‘पी फॉर सायन्स’ या स्लोगनखाली हे संशोधन करण्यात आले आहे. एका मोठ्या टाकीमध्ये मानवी मूत्र गोळा करण्यात आले. सौरऊर्जेच्या मदतीने बॉयलरद्वारे या मूत्राचे बाष्पीभवन करण्यात आले.
मशिनच्या वर जोडलेल्या मेंब्रेनमध्ये वाफ थंड करून त्यातून शुद्ध पाणी मिळविले. तसेच पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस यासारखी द्रव्य यातून वेगळी काढण्यात आली. स्टेडियम्स, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा यंत्रांचा वापर केला जाऊ शकतो आणि पिण्यायोग्य पाणी मिळू शकते.♍
मानवी मुत्रापासून पाणी बनवण्याचे तंत्र
Tags
माहिती