🔹म्हणुन देवघरात शनिची मुर्ती पुजत नाही🔹

म्हणुन देवघरात शनिची मुर्ती पुजत नाहीत. 

शनिदेवाच्या चेहरयाकडे पाहु नका, डोळयात पाहुन दर्शन घ्या 

दि १८ जुलै २०२०
शनिवार हा दिवस शनि देवाचा मानला गेला आहे.शनीदेवाबाबत म्हटले जाते की त्यांची दृष्टी सरळ कोणावर पडली तर तो भस्म होतो. त्यामुळे त्यांची पूजा करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. शनिदेवाची नाराजी आणि प्रसन्नता दोन्ही खतरनाक मानली जाते. कारण शनी देव नाराज किंवा प्रसन्न झाले तर ते सरळ त्याची दृष्टी भक्तांवर पडते आणि भक्तांचा नाश होऊ शकतो. 
भगवान शनी खूप रागीट देवता मानले जातात. जर नकळही त्यांच्या पूजनात चूक झाली, तर भगवान शनीदेव त्याला माफ करत नाही. त्यामुळे भगवान शनी देवाची पूजा करताना काही गोष्टी लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे. 
तुम्ही कोणाच्या  घरातील देवघरात शनिची मुर्ती पाहिली आहे का? नाही ना. त्याला कारणही तसेच आहे. 
शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, उलट असे म्हणतात की घराबाहेरच्या मंदिरात जाऊन शनी महाराजची पूजा करण्याचे विधान आहे. असे मानले जाते की शनिदेवाला शाप मिळाला आहे की ते ज्यांना पाहतील त्याचा नाश होईल.

आणि म्हणून शनिदेवाची दृष्टी टाळण्यासाठी त्यांची मूर्ती घरात ठेवू नये.जर तुम्ही मंदिरात शनिदेवाचे दर्शन घ्यायला गेलात तर त्याचे पाय पाहा नाकी त्यांच्या डोळ्यांत पाहून नमस्कार करा.
अशा परिस्थितीत तुम्हाला शनिदेवाची घरीच पूजा करायची असेल तर ते तुमच्या मनात ध्यान करून पूजा करा. तसेच शनिवारी हनुमान जीची पूजा करावी व शनिदेवाची आठवण करावी. याने शनीदेव खूष होतात.
▪️या गोष्टी लक्षात ठेवा. ▪️
‼️शनिदेवाची मूर्ती या प्रतिमा घरात नाही ठेवली पाहिजे. त्यांची पूजा ही मंदिरात किंवा मनातल्या मनात केली पाहिजे.  
‼️शनी देवाला जल किंवा तेल अर्पण करण्यासाठी कोणत्याही धातूचा वापर करू नका. त्यांच्याव तेल अर्पण करण्यासाठी लोखंडाच्या पात्राचा वापर करावा. तांब्याचा पात्राचा उपयोग चुकूनही करू नका.  ‼️शनी देवावर तेल अर्पण करताना त्यांच्यावरही पडेल याची काळजी घ्या, इतरत्र पडणार नाही याची खबरदारी बाळगा.  
‼️शनी देवावर लाल रंगाची वस्तू अर्पण करू नका. यात लाल रंगाचे फूल किंवा लाल रंगाचा कपडा चूकूनही अर्पण करू नका. 
‼️काळा रंगासंदर्भातील गोष्टी शनी देवाला अर्पित करा.  
‼️शनी देवावर तेल अर्पण करत असाल तर त्यात काळे तीळ टाका, नुसते तेल अर्पण करू नका. 
‼️ शनीदेवाचे पूजन करताना सरळ समोर उभे राहू नका. बाजूने त्यांचे दर्शन घ्या किंवा पूजा करा. 
‼️ शनी देवाची पूजा अशा ठिकाणी जाऊन करा, ज्या ठिकाणी ते शिळेच्या रुपात विराजमान असतील.  
‼️शनिवारी पिंपळाच्या झाडावर जल आणि दीपक लावा. हे फक्त शनिवारी करा.

म्हणुन देवघरात शनिची मुर्ती पुजत नाहीत.
या लेखाचा उद्देश अंधश्रध्दा पसरवण्याचा नाही. भक्तानी वाचावे, अभक्तानी सोडुन दयावे.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম