भावसार समाज : काल आणि आज

भावसार समाज : काल आणि आज 





दि. २५ जुलै २०२०
भावसार समाज प्रारंभी क्षत्रिय होता. मात्र, परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची शपथ घेतल्यानंतर या समाजाचे भावसिंह आणि सारसिंग हे आद्यपुरुष हिंगलाज मातेला शरण गेले. मातेनेही परशुरामापासून संरक्षण व्हावे म्हणून क्षत्रिय धर्म सोडून व्यापार, उद्योग करण्याचा मार्ग सूचविला. तेव्हापासून भावसार समाज व्यवसायासह नोकरी, उद्योगात स्थिरावलेला आहे.
भावसार समाजाचे नाते कापसातून सरकी निघाल्यानंतर तयार होणाऱ्या सुताशी आहे. कापसाच्या सुताला रंग देण्याचा व्यवसाय भावसार समाजाचा. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय रंगारींचा.  परंतु, काळाच्या ओघात हा व्यवसाय जवळपास बंद झाला आहे. ओबीसी संवर्गात मोडणाऱ्या  या समाजातील युवा पिढीचा कल शिक्षणाकडे वाढला आहे. 
सुरुवातीपासून सूत रंगविण्याच्या कार्यात असल्याने भावसार क्षत्रिय समाजाला रंगारी असेही म्हटले जाते. रंगारी नावाचीच भावसार समाजाची बोलीभाषा आाहे. या समाजातील मोजके लोक आता शेती व्यवसायात आहेत. आद्य पुरुषांच्या आद्यनामावरूनच या समाजाचे 'भावसार' असे नामकरण झालेले आहे. हिंगलाज मातेचे मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे आहे. हिंगलाज माता शक्तीपीठ पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगरा
भावसार समाज : काल आणि आज

च्या गुहेत हे मंदिर आहे. भावसार क्षत्रियसह सिंधी, खत्री गोसावी तसेच मुस्लिम समाजबांधवही या मंदिरात जाऊन देवीची आराधना करतात. 

भावसार समाज : काल आणि आज

पाकिस्तानात ही देवी 'नानी माँ' म्हणून प्रसिद्ध आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ४ दिवसांची हिंगलाज माता यात्रा (नानी का हज) आयोजित केली जाते.
पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार ही यात्रा कराचीमधील नानद पंथी आखाडा येथून सुरु होते. आखाड्यातील एका साधूची यात्रेचा प्रमुख निवड केली जाते आणि त्या साधूच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडते. या यात्रेसाठी भारत आणि पाकिस्तानातून हजारो लोक हिंगलाजला जातात. काही लोक ही यात्रा पायी करण्याचा नवस बोलून या यात्रेचा कराची ते हिंगलाज हा अतिशय खडतर प्रवास पायी करतात.
जनरल झिया उल हक पाकिस्तानी राष्ट्रपती असताना त्यांनी पाकिस्तानचे पद्धतशिरपणे इस्लामीकरण घडवून आणले. अल्पसंख्यक हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम होण्यास भाग पाडण्यात आले. त्यांची मंदिरे तोडण्यात आली. याच काळात हिंगलाज माता मंदिराचीसुद्धा फार मोठी दुरवस्था झाली. सध्याचे पाकिस्तानी सरकार मंदिराला कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इतर मदत देत नाही.
 हिंगलाज माता मंदिर कमिटी या मंदिराची देखभाल करते. ह्या मंदिरावरसुद्धा पाकिस्तानातील इतर मंदिरांप्रमाणे वेळोवेळी इस्लामी अतिरेक्यांकडून हल्ले होत असतात.बहुसंख्य बलूच लोक मुस्लिम असले तरी हिंगलाज माता मंदिराला त्यांच्या संस्कृतीचा भाग मानतात. ही संस्कृती जपण्यासाठी त्यांनी मंदिराच्या रक्षणासाठी बलूच लोकांची खासगी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली असून त्यांनी कित्येक वेळा मंदिराचे अतिरेकी हल्ल्यांपासून रक्षण केले आहे.
फाळणीनंतर हा समाज अर्थातच भारतात राहिला. देशविभाजनामुळे इच्छा असुनही अनेकाना मातेच्या दर्शनास जाणे होत नाही. 

भावसार समाज : काल आणि आज

भावसार समाज हा देशभरात नदीच्या काठावर वसलेला हा समाज. नदीच्या तिरावर लांबच लांब सूत रंगवून ते वाळत घालत असत.भावसार समाजाच्या निर्मितीला आध्यात्मिक-धार्मिक आधार आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील हा ‘क्षत्रिय’ समाज. 
अनादी काळापासून जंगलातील पाने, फुले, वनस्पती व मुळांपासून रंग बनविण्याची कला अंगीकारून हा समाज रंग काढण्याचे काम करू लागला. पुढे रंगारी अशी या समाजाची ओळख बनली. यासाठी पाण्याची गरज असल्याने भावसार समाज देशातील गाव खेड्यांत नदी काठावर आजही वसला आहे. सूत रंगविल्यानंतर कोष्टी (हलबा) समाज त्यापासून वस्त्रनिर्मितीचा व्यवसाय करीत होते. हलबांचा विणकरी व्यवसाय बंद पडल्यानंतर भावसारांच्या रंगाई व्यवसायावरही संकट आले. यामुळे शिक्षण-नोकरी व इतर व्यवसायाकडे वळल्याने या समाजाची रंगारी ही ओळख आता इतिहास जमा झाली आहे.गुजरात हे भावसार क्षत्रिय समाजाचे मूळ स्थान मानले जाते. 

भावसार समाजाची साडेतीन पीठे

महाराष्ट्र आणि विदर्भात भावसार समाजाच्या आदिमाया शक्तीची मुख्य अशी साडेतीन पीठे  आहेत. मुख्य शक्तिपीठाची १०८ उपपीठे आहेत. त्यांनासुद्धा शक्तिपीठ असेच संबोधले जाते.
१) महालक्ष्मी कोल्हापूर - पूर्णपीठ
२) तुळजाभवानी तुळजापूर-पूर्णपीठ
३) रेणुकामाता माहूर- पूर्णपीठ
४) सप्तशृंगीमाता वणी -अर्धपीठ
भावसार समाजाला संत जनाबाईंच्या विचारांचा वारसा लाभला आहे. तसेच भावसार समाजातील भाऊसाहेब लक्ष्मण जावळे ऊर्फ भाऊसाहेब रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक असे संबोधतात. ते स्वातंत्र्य संग्रामातील सैनिक होते. १८९२ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाची पुण्यात मुहूर्तमेढ रोवली. दहा दिवस वेगवेगळे सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम येथे घेण्यात आले होते. या उपक्रमाचे केसरीतून लोकमान्य टिळकांनी २६ सप्टेंबर १८९३ रोजीच्या अंकात कौतुक केले होते.पाकिस्तानात या मंदिराला नानी का मंदिर म्हणूनही ओळखतात. भारतीयांना या ठिकाणी जाणे सहजशक्य नसल्याने हुबळी येथे अंबाभवानी शक्तीपीठाची उभारणी करण्यात येत आहे. त्याठिकाणी हिंगलाज माता शक्तीपीठातील देवीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे भावसार समाजातील बहुसंख्य लोकांना दर्शनासाठी जाणे सोपे होणार आहे. 
भावसार क्षत्रिय समाजासाठी राज्यात काम करणाऱ्या सुमारे ३४६ नोंदणीकृत संस्था आहेत. यातील ८८ संस्था महिलांच्या आाहेत. या संस्थांच्या माध्यमातून समाजातील तरुण, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य हेच कार्याचे उद्दिष्टे ठरवून या शाखा त्या त्या भागातील समाजबांधवांसाठी स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे काम करीत असतात. गुजरात राज्य हे भावसार क्षत्रिय समाजाचे मूळ स्थान मानले जाते. मात्र, व्यवसाय-नोकरीनिमित्त हा समाज देशभर पसरला. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भावसार समाजाची लोकसंख्या लक्षणीयरित्या आहे.कोल्हापुरात १९१२ साली भावसार समाजाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन थाटात पार पडले होते. त्यानंतर २०११ साली भावसार समाजाचा शताब्दी सोहळा भावसार व्हीजन चे संस्थापक श्री नारायणजी तातुसकर यांच्या प्रेरनेने कर्नाटकातील हुबळी येथे संपन्न झाला. औरंगाबाद शहरातही या समाजाचे विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे.
भावसार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा रंगारीचा होता. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय जवळपास बंद झाला आहे. समाजातील युवा पिढीचा शिक्षणाकडे कल वाढल्याने नोकरी व अन्य व्यवसायात भावसार समाज अधिक संख्येने दिसून येत आहे.समाजाला आतापर्यंत राजकीय प्रतिनिधित्वाची मोठी संधी मिळाली नाही. मात्र, त्यावर विसंबून न राहता समाजाने शिक्षणावर पूर्वीपासून भर दिला. त्यामुळे भावसार समाज १०० टक्के साक्षर आहे. नोकरीच्या संधी तसेच, कौशल्य शिक्षणावर भर देत आपल्या तरुण पिढीवर व्यवसायाचेही संस्कार रुजविण्यात समाजाला यश आले. त्यामुळेच नोकरीबरोबरच व्यापारासह उद्योग, कला अशा विविध क्षेत्रात समाजातील अनेकांनी भरीव कामगिरी केली आहे. यातून समाज स्वावलंबी कसा होईल, याचा ध्यास घेऊन समाजातील संघटना, संस्था अहोरात्र काम करीत आहेत.
भावसार क्षत्रिय समाजाची कर्नाटकातील धारवाड येथे १९११ रोजी राष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. या अंतर्गत महाराष्ट्रात १९८८ रोजी राज्य संघटनेची स्थापना करण्यात आली. भावसार क्षत्रिय समाजाची देशभरात सुमारे ४० लाख, तर महाराष्ट्रात सुमारे तीन लाख लोकसंख्या आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाने आपल्याच पातळीवर जनगणनेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात  https://forms.gle/UAgYeDFSiYJzm8MH7 
 या लिंकवर जाऊन समाजबांधवांनी आपल्या कुटुंबीयांची माहिती  भरता येईल.
भावसार समाज आज निश्चितच प्रगतीपथावर आहे. 

लेखन : अनिल पाटील, पेठवडगाव, कोल्हापुर. 
9890875498
सर्व छायाचित्रे : गुगलवरून
=======================

🥥 भावसार समाजाची हिग्लांजदेवी गडहिंग्लजला कशी? हा लेख पुढील लिंकवर वाचा. 


_____________________________
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম