नागपंचमी : पेठवडगाव

नाग हा असा प्राणी की ह्याच प्रभुत्व जगातील बहुतांश देशातील लोकजीवनात कमी अधिक प्रमाणात दिसून येते.
"भारतीय उप महाद्वीपा" मधील तर..! हा प्रत्येक जाती धर्मात नागाला पुज्य मानले गेले, ह्याचा मान तर देवांचा देव "महादेव" ह्यांच्या मस्तकावर हा विराजमान झाला.
  ह्याला कुठे पूर्वजांच्या रुपात तर कुठे शिवारातील क्षेत्ररक्षक म्हसोबा स्वरूपात बांधाखीळा वर पुजला गेला.
तर कुठे पौरुषत्वाच प्रतीक म्हणून पुजला गेला.
काळभैरवनाथाच्या हातातील असूडरूपी काळसर्प बनून गावपांढरीच रक्षणकर्ता झाला...
  दक्षीणपथात ह्याच अस्तित्व कायम गूढ रहस्यमयी बनून राहिलेल्या नागदेवतेचा उध्या सण आहे....
नागपंचमी. 
फोटो : नागोबावाडी, पेठवडगाव 
नागपंचमी : पेठवडगाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম