🔹संजीवनी शोधण्याचे प्रयत्न होणार 🔹

संजिवनी वनस्पती शोधण्याचे प्रयत्न होणार

रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानने हिमलयातून ‘संजिवनी’ आणली होती🌿.हे आपणाला माहिती आहेच. 
फेसबुक https://parg.co/UoD5
संजीवनी शोध
नेमकी संजिवनी वनस्पती कोणती हे ओळखता न आल्याने पूर्ण द्रोणगिरी पर्वतच हनुमानाने उचलून लंकेला नेला होता. असे रामायणात उल्लेख आहे.या संजिवनी वनस्पतीची भूरळ संशोधकांना आणि ऋषीमुनींना प्राचिन काळापासूनच आहे. ही संजिवनी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न आता सरकार करणार आहे.♍🌿
आयुष मंत्रालयाने यासाठी समिती स्थापन केली असून उत्तराखंड सरकारने यासाठी निधी दिला आहे.🌿
मंत्री सुरेंद्रसिंग नेगी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘जागतिक पातळीवर औषधी वनस्पतींची मागणी प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे जीव वाचवण्याची क्षमता असलेली ही वनस्पती आम्ही शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’
आयुर्वेदामधील तज्ज्ञांची समिती स्थापण्यात आली असून ही समिती ऑगस्ट महिन्यात काम सुरू करणार आहे.
रामायणात द्रोणगिरी पर्वताचा दाखला आहे. उत्तराखंडमध्ये आजही द्रोणगिरी नावाने पर्वत आहे. डेहराडूनपासनू ४०० किलोमीटर अंतरावर चामोलीमध्ये हा पर्वत आहे. या पर्वतावर संजिवनी शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यापूर्वी २००८ मध्ये बाबा रामदेव यांचे शिष्य आचार्य बालकृष्ण यांनी संजिवनी वनस्पती शोधण्यात आल्याचा दावा केला होता.
उत्तराखंड ही औषधी वनस्पतींची खाण असून औषधी गुणधर्म असलेल्या अनेक वनस्पती येथे सापडतात.

संजिवनी वनस्पती शोधण्याचे प्रयत्न होणार

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম