येथे १६ फूट तुपाच्या आवरणाखाली आहे शिवलिंग

येथे १६ फूट तुपाच्या आवरणाखाली आहे शिवलिंग 


 दि. १९ जुलै २०२०
    तिरुवनंतपूरम : केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. त्याचे नाव आहे ‘वडकुनाथन’ मंदिर. त्याला तेकैलाशम आणि तामिळी भाषेत ऋषभाचल असेही म्हटले जाते. केरळमधील सर्वात प्राचीन व सुंदर मंदिरांमध्ये या शिवमंदिराचा समावेश होतो. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवलिंग नेहमी तुपाच्या 16 फूट उंचीच्या आवरणाखाली झाकलेले असते.
वडकुनाथन याचा अर्थ ‘उत्तरेचा नाथ’ असा होता. हा निर्देश कदाचित केदारनाथबाबतही असू शकतो. या शिवलिंगाची स्थापना परशुरामाने केली, अशी स्थानिक लोकांमध्ये भावना आहे. या मंदिराला यूनेस्कोचा एक पुरस्कारही मिळाला आहे. येथील धार्मिक परंपरेनुसार तेथील शिवलिंगाला तुपाचा अभिषेक केला जातो आणि संपूर्णपणे तुपाने झाकलेले असल्याने शिवलिंग दिसून येत नाही. हा तुपाचा डोंगर कैलास पर्वताचे प्रतीक असल्याचे मानले जाते. मंदिरात दरवर्षी आनापूरम महोत्सव साजरा होतो. त्यावेळी हत्तींना विशेष खाद्यपदार्थ खाऊ घातले जातात. आधी सर्वात छोट्या हत्तीला जेवण देऊन मग हत्तींची ही मेजवानी सुरू होते.

__________________________

येथे १६ फूट तुपाच्या आवरणाखाली आहे शिवलिंग

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম