अंडयाच्या क्रेटवर बसुनही अंडी फुटली नाही

अर्धातास अंड्याच्या क्रेटवर बसून एकही अंड फुटल नाही; सहा वर्षाच्या चिमुरडीची कमाल


तामिळनाडूमध्ये इहनिया अरुण या सहा वर्षाच्या चिमुरडीने अनोखी कमाल करुन दाखवली आहे.

अंडयाचे कवच एकदम नाजूक असते. कवचावर थोडा जरी दाब पडला तर लगेच अंड फुटते. त्यामुळे खाण्यापूर्वी अंड जपून हाताळावे लागते. याच अंडयाच्या क्रेटवर बसून एकही अंड फुटू न देता योगासन करुन दाखवण्याची किमया इहनियाने केली आहे.
इहनियाने अंडयाच्या क्रेटवर योगासनातील पद्मासनाचा प्रकार करुन दाखवला. इहनियाने तीस अंडयाच्या क्रेटमधील एकही अंडे फुटू न देता हे पद्मासन करुन दाखवले.
जवळपास अर्धातास ती पद्मासन आसनाच्या स्थितीत बसली होती. इहनियाचे वजन १८ किलो आहे. अशा प्रकारचा योगा करत तिने एक वेगळा विक्रम केला आहे.♍सोबत फोटो

अर्धातास अंड्याच्या क्रेटवर बसून एकही अंड फुटल नाही; सहा वर्षाच्या चिमुरडीची कमाल

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম