मुत्युनंतर फेसबुक खात्याचे काय होते?

 मृत्यूनंतर फेसबुक खात्याचे काय होते ? 


.        दि. ३१  जूलै २०२०
  आपण नेहमी विचार करत असाल की एखादा फेसबुक वापरणारा व्यक्ती मृत्यु पावला तर त्याच्या फेसबुक अकाउंटचे काय होत असेल?
फेसबुकवर त्याबाबत एक पर्याय असतो ज्यामध्ये आपण आपल्यानंतर अकाउंटचा वारसा हक्क कोणाला द्यायचा म्हणजेच लीगसी सेटिंग्स. परंतु जर आपण असा वारसा हक्क स्वतःहून कणाला दिला नसेल तर तुमच्या मरणानंतर तुमचा डेटा कोणालाही मिळणार नाही.
अगदी जवळच्या नातेवाईकांनाही नाही. जवळचे नातेवाईक किंवा मित्र तुमच्या फेसबुक अकाउंटचे रूपांतर श्रद्धांजली अकाउंट मध्ये करू शकतात. पण जर तुम्हाला अशी कधी भीती वाटत असेल की, तुमच्या मरणानंतर तुमची खाजगी माहिती कोणाला उघड केलेली जाऊ शकते.   
https://parg.co/bNA1

तर तुम्ही त्याबाबत काळजी करू नका. कारण नुकतीच जर्मनीमध्ये याबाबत एक घटना घडली. खरतर ही घटना २०१२ ची असून या घटनेत एका मुलीचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला होता.
त्यानंतर त्या मुलीच्या आई वडिलांनी तिच्या फेसबुकच्या सर्व डेटाची मागणी केली. तिचे फेसबुकवरील इतरांसोबत केलेले संभाषण मेसेजेस त्यांना हवे होते. परंतु फेसबुकने ही खाजगी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याबद्दल त्या मुलीच्या कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २०१५ साली फेसबुकला सर्व माहिती देण्याचे आदेश दिले.
परंतु फेसबुक युजरच्या खाजगी माहितीबाबत फेसबुक खूप काटेकोर असल्याने फेसबुकने वरील न्यायालयात धाव घेतली. तसेच वारसा हक्कच्या सेटिंग्स केले नसल्याचेही दाखवून दिले.
नातेवाईक केवळ संपूर्ण डेटा पूर्णपणे डिलीट करू शकतात, पण मिळवू शकत नाहीत हे फेसबुकने कोर्टात स्पष्ट केले. आता जुलै २०१८ ला जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने फेसबुकला पुन्हा आदेश दिले आहेत, की त्या मुलीचा संपूर्ण डेटा आणि मेसेजेस नातेवाईकांना दिले जावे.
कारण मुलगी अल्पवयीन होती, आणि अल्पवयीन मुलांचे सर्व वारसा अधिकार हे पालकांचेच असतात. यानंतर आता फेसबुक काय पाऊल उचलणार हे बघण्यासारखे आहे. ‘फेसबुकच्या भूमिकेकडे बघू आपल्याला एक लक्षात येईल की, फेसबुक ही कंपनी आपल्या युसर्सच्या खाजगी सुरक्षेबाबत फारच काटेकोर आहे.
ज्यांनाही भीती सतावत असेल की, आपल्या मरणानंतर कदाचित आपले फेसबुकवरील खाजगी आयुष्य धोक्यात येऊ शकते.
त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे, परंतु सुरक्षा यंत्रणा जसे पोलीस किंवा कोर्ट यांना त्यांच्या मागणीनुसार कोणाचाही डेटा घेण्याचा कायदा आहे आणि ते फेसबुक नाकारू शकत नाही हेही खरच असून त्याशिवाय फेसबुकवरील गुन्हे उघड होणारच
नाहीत.
– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ)
____________________________

मृत्यूनंतर फेसबुक खात्याचे काय होते ?

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম