रजनिकांत कोल्हापुरचा आहे म्हणतात ते खरे नाही
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत १००℅ मराठी आहे पण कोल्हापुरी नाही.
त्यांच्या बद्दल माहिती पुरवताना अनेकजण ते कोल्हापुर चे असल्याचे सांगतात पण ते खरे नाही. त्याचा व कोल्हापुरचा काहीच संबध नाही.शिवाजीराव रामोजीराव गायकवाड हे त्यांचे खरे नाव. त्यांची मातृभाषा मराठी असली,तरी मराठी पासुन ते कोसो दुर आहेत.
ते बेंगलोरच्या मराठी कुंटुबांत जन्मले. पण त्यांचे पुर्वज दोन-तीन पिढयापुर्वी महाराष्ट्र सोडुन कर्नाटकात स्थायिक झाले असल्याने मराठी फक्त ते घरीच बोलत असतील. त्यांचे मुळ गाव जेजुरीजवळ असलेले मावळीकडेपठार (ता. पुरंदर) हे होय. या गावात आजही गायकवाड आडनावाचे अनेक कुटुंबीय आहेत. पण त्यांचा व रजनिकांतचा आता काहीच संबध राहिलेला नाही.
वडील पोलीस हवालदार होते. हा सगळ्यात धाकटा.रजनीकांत ह्यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि एक अश्विनी बाळुबाई गायकवाड नावाची एक बहिण ही आहे. बेंगलोरमध्येच त्याला कंडक्टरची नोकरी मिळाली.पण त्यांना अभिनयाची आवड असलेने त्यांनी चेन्नईमध्ये मद्रास फिल्म इंस्टीट्युट मध्ये प्रवेश घेतला. तेथेच त्यांना के. बालाचंदर नावाचे दिग्दर्शक भेटले व दाक्षिणात्य चित्रपटात त्यांचा प्रवेश झाला.
रजनीकांतच्या वेगवेगळ्या स्टाईल त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. त्याची आधी हवेत सिगरेट उडवून नंतर ती ओठाने पकडत पुन्हा पेटवण्याच्या स्टाईलचं वेड तर त्याच्या जगभरातील चाहत्यांना आहे. तमिळमधले अनेक अभिनेते देखील त्याची ही स्टाईल कॉपी करतात.
रजनीकांत ज्या पद्धतीने सिगरेट हवेत उडवून ती पेटवतो, ते केवळ त्यालाच जमू शकतं. या स्टाईलने त्यांची लोकप्रियता वाढली.
त्यांनी हिंदी चित्रपटात सुध्दा काही भुमिका केल्या आहेत. रजनीकांत सध्याच्या घडीला आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत.
रजनिकांत राजकारण पण करू पाहतो आहे. पण अजुनतरी तो राजकारणापासुन दुर आहे.