🔹पाणी जपुन प्या🔹

*⭕पाणी प्यावं जपून मापून*!⭕
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
पोट म्हणजे पाणी साठवण्याचा हौद नव्हे.   पाणी पिताना  ते समजून उमजून अन मोजून मापूनच प्यावं!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=197485340649397&id=100011637976439
धरणातील पाणी संपत आलं की, पाणी वापरात कपात सुरू होते. त्याची विविध नियमावली सतत सांगितली जाते. पर्यावरण संतुलनासाठी हे आवश्यक असतं. त्याचप्रमाणो आरोग्याच्या संतुलनाचा विषयही महत्त्वाचा. आणि त्यासाठी पाणी पिण्याचं विशिष्ट नियोजन करणं, पाणी पिण्याला काही नियम लावून घेणं हेदेखील महत्त्वाचं असतं.
पाणी केव्हा आणि किती प्यावं?
अन्नपचनासाठी व इतर कार्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. पाण्याची ही गरज व्यक्तीची प्रकृती, ऋतू, कोणत्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, असलेले आजार यावरून ठरत असते. पाणी केव्हा आणि किती प्यावं यासाठी सर्वात सोपा नियम म्हणजे ‘तहान लागली की पाणी प्यावं आणि तहान शमेल इतकं च पाणी प्यावं’. ग्लास भरून पाणी घेतलं आहे म्हणजे ते सर्व संपवायलाच हवं असं नाही. दिवसभरात 5-6 बाटल्या, उठल्यावर 2-3 तांबे, जेवणानंतर दोन तांबे असे पाण्याचे नियम करून तेवढं पाणी प्यायला आपल्या शरीरात काही हौद ठेवलेला नाही! गरज नसताना एवढं पाणी प्याल्यावर हे जास्तीचं पाणी काढण्यासाठी शरीर यंत्रणोवर अतिरिक्त ताण येतो. अनेक वर्षे असं घडत राहिल्यास काही आजारांचं मूळही मग पाणीच ठरतं. शरीरास पाण्याची गरज आहे हे समजण्यासाठी आपल्याकडे यंत्र दिलेलं आहे. ‘तहान लागणं’ हे ते यंत्र. मग तहान नसताना बळजबरीनं पाणी का प्यावं?
पाण्याच्या गरजेची शास्त्रीय ओळख
पाणी पितानाही शास्त्र समजून घेणं महत्त्वाचं. सर्वाना जगण्यासाठी पाणी लागतं हे सत्य आहे. पण ते सर्वाना समान लागतं असं मात्र नाही. यामागे शास्त्र आहे. प्रकृतीच्या दृष्टीनं बघितलं तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पाण्याची गरज इतरांच्या मानानं थोडी जास्त असते. उन्हाळ्यात घामाद्वारे पाण्याचं उत्सजर्न म्हणून इतर ऋतूंपेक्षा पाणी जास्त लागतं. पण जर दिवसभर एसीमध्ये काम करत असाल तर ही गरज कमी होईल.
मुंबईसारखे समुद्रकिनारपट्टीवरील प्रदेश जिथे अधिक घाम येतो किंवा मराठवाडा, विदर्भ, राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात पाण्याची गरज अधिक असते. परंतु नाशिकसारख्या प्रदेशात त्या तुलनेत पाण्याची गरज कमी होते.
पाणी पिण्याच्या योग्य-अयोग्य सवयी
सकाळी उठल्या उठल्या व रात्री झोपताना पाणी पिऊ नये. सतत सर्दी होणं, नाक चोंदणं, दमा, स्थूलता, रक्तदाब वृद्धी यासारख्या आजारांचं हे कारण ठरतं. या काळात पाणी घेणं कधी आवश्यक असल्यास कडक गरम पाणी व तेही फक्त अर्धा कपच घ्यावं. जेवताना जेवणाच्या मध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. जेवणापूर्वी पाणी घेतल्यास ते कृशता आणतं, तर जेवणानंतर पाणी घेतल्यास स्थूलता येते. जेवणानंतर भरपूर पाणी पिण्यानं मानेच्या वरील भागांतील अवयवांचे आजार होतात.
अतिसार, मूतखडा, युरीन इन्फेक्शन या आजारात पाण्याचं प्रमाण वाढवावं, तर अजीेर्ण, पचनशक्ती मंद असणं, सूज येणं, सतत सर्दी, दमा, रक्तदाब वृद्धी या आजारात नियंत्रित पाणी प्यावं. चहा, कॉफी, ताक आहारातील इतर द्रवपदार्थ यांचं प्रमाणही दिवसभरातील पाण्याचं प्रमाण ठरवताना विचारात घ्यायला हवं.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম