🔹१२८० किलोची सोन्याची मुर्ती🔹

१२८० किलो सोन्याची श्रीकृष्णमूर्ती!
http://bit.ly/3zWYmEP

१२८० किलो सोन्याची श्रीकृष्णमूर्ती!

रांची :झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 230 किलोमीटरवर असलेल्या नगर उंटारी येथील वंशीधर मंदिरात तब्बल 1280 किलो वजनाची सोन्याची श्रीकृष्णमूर्ती आहे. चार फूट उंच असलेली ही मूर्ती अतिशय मनमोहक आहे. या मूर्तीवर सोन्याचेच छत्र असून हातात सोन्याचीच बासरीही आहे. या प्राचीन मूर्तीची किंमत करणे कठीण असले तरी ती सध्याच्या काळातील कोट्यवधी रुपये किमतीची असू शकते, असे म्हटले जाते.
उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि बिहारच्या सीमेजवळच हे नगर उंटारी आहे. त्यामुळे देश-विदेशातील अनेक भक्त, पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते. दरवर्षी फाल्गुन महिन्यात इथे मोठी यात्राही भरते. या मूर्तीचा आणि मंदिराचा इतिहासही कुतूहलजनक आहे. 1884 मध्ये नगर उंटारीचे महाराज भवानी सिंह यांच्या पत्नी राणी शिवमानी कुंवर यांना शिवपहरी टेकडीवर जमिनीत श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत झाला. त्यानुसार राणी आपल्या लवाजमा घेऊन त्या स्थानावर गेल्या. तिथे विशिष्ट ठिकाणी खोदकाम केल्यावर खरोखरच ही मूर्ती सापडली. ही मूर्ती हत्तीवर ठेवून ती नगरात आणली जात असताना मुख्य द्वाराच्या अलीकडेच हा हत्ती खाली बसला आणि अनेक प्रयत्नांनंतरही उठला नाही. त्यामुळे राणीने याच ठिकाणी कृष्णाचे मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. वाराणसीतून श्रीराधेचीही अष्टधातूची मूर्ती बनवून ती श्रीकृष्णाबरोबर स्थापित केली गेली.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম