शाकाहारी मटण

 शाकाहारी मटण 
-------------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव               

  ------------------------------------------
झारखंडमध्ये एक विशिष्ट प्रकारची आळिंबी (मशरूम) आहे. त्यामधील प्रोटिनचे प्रमाण आणि चव यांचा विचार करून अनेक लोक त्याला ‘शाकाहारी मटण’ असेच म्हणतात. रुगडा नावाची ही आळिंबी झारखंडच्या जंगलांमध्ये आढळते आणि ती अत्यंत स्वादिष्ट असते. बटाट्यासारख्या दिसणार्‍या या आळिंबीमध्ये प्रोटिन भरपूर असले तरी कॅलरीज आणि मेद यांचे प्रमाण अत्यल्प असते.
बटाट्या प्रमाणेच ही आळिंबीही जमिनीखालीच विकसित होते. अन्य आळिंबीप्रमाणे तिची वाढ जमिनीबाहेर नसते. शिवाय साल वृक्षाच्या खालीच ही आळिंबी असते हे विशेष. पावसाळ्यात साल वृक्षांच्या खाली असलेल्या जमिनीतील भेगांमध्ये पाणी जाऊ लागले की ही आळिंबी विकसित होऊ लागते. ग्रामीण भागातील लोक ही आळिंबी गोळा करून विकतात व त्यामुळे त्यांची चांगली कमाई होते. झारखंडमधील एक तज्ज्ञ डॉ. रमेशचंद्र या रुगडावर गेल्या दहा वर्षांपासून संशोधन करीत आहेत. ही आळिंबी दीर्घकाळ ताजी कशी ठेवता येईल यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. ही आळिंबी तीन ते चार दिवसांमध्येच खराब होते. मात्र, नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तिला चार महिने ताजी ठेवता येऊ शकेल. त्यामुळे देशाच्या अन्य भागांमध्येही ही आळिंबी निर्यात करता येईल. ही आळिंबी आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे 


शाकाहारी मटण
ko

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম