भगतसिंहाची फाशी व म. गांधी



  भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय?    

  भगतसिंगांसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगांची फाशी वाचवु शकले असते, परंतु जाणुनबुजुन त्यांनी तसं केलं नाही. “अशी एक चर्चा सध्या मुद्दामहून होत आहे. पण त्याबाबतची वस्तुस्थिती वेगळीच आहे.  

भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय?

भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा, ७ ऑक्टोबर १९३० ला सुनावण्यात आली. या शिक्षेच्या विरुद्ध केलेले special petition हे त्यावेळी privy council समोर करावे लागत होते. ते petition ११ फेब्रुवारी रोजी फेटाळले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू १९२९ च्या कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी-आयर्विन कराराचा मसुदा त्यांचाच होता. या कराराच्या वेळीही भगत सिंहला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता. 
नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ ला दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळली गेली. गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा १७ फेब्रुवारी पासून सुरू होऊन ५ मार्च १९३१ ला पुर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला. त्यावेळी देखील भगत सिंहच्या माफीवर चर्चा झाली. या वेळी करारा दरम्यान गांधीजींनी ९० हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली. त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा २१ मार्च ला गांधीजीनी लॉर्ड आयर्विन ची भेट घेवून भगत सिंह ला माफी देण्याची विनंती केली. याच अनुषंगाने २२ मार्च ला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंगच्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.

लॉर्ड आयर्विन यांना पत्र

गांधीजींनी २३ मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली. हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिले. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील कांही उपयोग झाला नाही. भगत आणि त्याच्या सहकार्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला. १९३१ मध्ये कराची मध्ये होणाऱ्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते. त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले. गांधींनी काय प्रयत्न केले याची माहिती नेहरूंच्या आत्मचरित्रातून किंवा संन्याल वगैरेंच्या लिखाणातून मिळते. अगदी याचा दाखला लॉर्ड आयर्विन यांच्याही लिखाणात आहे
इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याची ही काही कारणे होती.
भगत विरोधात प्रचंड नाराजी Civil Services Officers मध्ये होती. पंजाब प्रांताच्या गवर्नर ने भगत सिंग ला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती. कारण भगत ला फाशी Saunders च्या हत्येच्या खटल्यात झाली होती. त्यामुळे युरोपियन ICS केडर फाशीचे समर्थक होते. ICS केडर च्या नाराजीचा परिणाम असा होता की, संपूर्ण वसाहती देशातील ICS केडर च्या अधिकाऱ्यांची एकी निर्माण झालीअसती. ब्रिटीश त्यांच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने भारतातील भगत सिंह साठी आफ्रिका, म्यानमार, अफगाणिस्तान, अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते. याचा दुसरा परिणाम देखील असा होता की – ब्रिटीश युवक वसाहतीतील नौकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत! ICS केडर च्या एकजुटीचा उद्देश हा देखील होता!
या सर्व कारणास्तव भगत सिंह ला माफी मिळणे कठीण गोष्ट होती. आणि एकदा दया याचिका फेटाळली की निर्णय पूर्णतः पंजाब गवर्नर च्या हातात होता. या बाबत विस्तृत माहिती असफ अली, अरुणा असफ अली आणि जे. एन . सन्याल यांनी लिहिली आहे. वी.एन. दत्त यांनी गांधीनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. भगत सिंह यांना वाचविण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे. खुद्द पटेल आणि नेहरूंनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले.
पण महत्वाची गोष्ट अशी की भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी – नेहरू – पटेल यांनीच केला. आज भगत सिंह यांची बाजू घेवून गांधी वर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही.
स्वातंत्र्य वीर सावरकर त्यावेळी रत्नागिरी इथे वास्तव्यास होते ,त्यांनी एखादे पत्रक काढून किंवा लेख लिहून भगत सिंह, सुखदेव ,राजगुरू यांना माफी द्यावी असे आवाहन केले नाही. त्यावेळी केशव बळीराम हेडगेवार हे सरसंघचालक होते. मात्र त्यांनी पत्रक काढून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे असे आव्हान केले. ही बाब संघ विचारांचे लेखक चं. प. भिशीकर यांनी नमूद केली आहे. मात्र सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे म्हणून पत्रक काढणाऱ्या संघाने भगत सिंह चे समर्थन करणारे किंवा भगत सिंह ला माफी द्यावी असे कोणतेही पत्रक काढले नाही किंवा तसे प्रयत्न देखील केले नाही.
भगत सिंह चे कार्य महान आहेच. पण भगत सिंह ला माफी मिळाली असती तर काही अटी नक्कीच लादल्या गेल्याअसत्या. कारण सरकार माफी देताना अशा अटीवरच माफी देत असे. उदाहरणार्थ सांगायचे तर, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अंदमान हून सुटका करून घेताना सरकार विरोधात कोणतेही कार्य करणार नाही, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही, नेहमी मायबाप इंग्रज सरकारच्या आदेशाचा सन्मान केला जाईल अशा अटी लादल्या होत्या ! सावरकर यांनी प्रामाणिकपणे ब्रिटीशांच्या अटीचे तंतोतंत पालन केल्यामुळे सावरकर यांच्यावर ब्रिटिशांनी कोणतीही कारवाई केली नाही. पण भगत सिंह यांचे एकंदर क्रांतिकारी विचार पाहता आणि स्वाभिमानी स्वभाव पाहता भगत सिंह याने या अटीचे पालन केले असते असे आपण ठामपणे म्हणून शकत नाही. आणि अटी न पाळणाऱ्या भगत सिंहला सतत माफी मिळणे देखील अशक्य होते. भगत सिंह ला माफी मिळाली असती तर त्याचे नाव कदाचित एवढे अजरामर झालेच नसते.
भगत सिंह हिंदुत्ववादी नव्हता तर तो मार्क्सवादी होता. नास्तिक होता आणि जन्माने तथाकथित उच्चवर्णीय देखील नव्हता! त्यामुळे माफी मिळाल्यानंतर माफिनाम्यातील अटीनुसार ब्रिटीश मायबाप सरकारचे आदेश तंतोतंत पालन त्यास करावे लागले असते आणि असे पालन त्यानेही केले असते तर माफी मागणाऱ्या इतरांना ज्याप्रमाणे गौरविण्यात आले, तो गौरव,तो सन्मान त्याला मिळाला असता किंवा दिला गेला असता – याची शक्यता खूप धुसर असल्याचे चित्र दिसते. भारतीय समाज रचनेचे ते एक वास्तव आहे.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────
🌹............................................
.       ണคн¡т¡ รεvค*_
.       :::::∴━━━✿━━━∴::::
.        
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম