🔹हे मंदिर पहाल तर ताजमहल विसराल🔹



  या मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल !   




  माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯

.        दि.  ५ जून २०२०
  जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताज महाल. पण राजस्थानच्या माउंट आबू येथील दिलवाडा हे मंदिर प्राचीन भारताच्या आश्चर्यकारक वास्तूकलेचे एक आश्चर्यकारक उदाहरण आहे. पण तरी हे मंदिर अजूनही अज्ञात आहे     

____________________________
हे मंदिर आणि ह्याची वास्तूकला एवढी सुंदर आहे की त्यासमोर आपण ताज महाल देखील विसरू. एवढं सुंदर आणि मन मोहून टाकणारं, अद्वितीय सौंदर्य आहे ह्या मंदिराचं. एकीकडे ताज महालाचे बांधकाम हे ६ व्या शतकात झाले तर ह्या दिलवाडा मंदिराचे बांधकाम हे ११ व्या ते १३ शतका दरम्यान झाले. हे मंदिर देखील ताज महालाप्रमाणे संगमरवराचं आहे.हे मंदिर पाच मंदिरांचं एकत्रित करून बनविलं आहे. ह्याचे बांधकाम हे सोलंकी राजा वास्तूपाल आणि तेजपाल ह्या दोन भावंडांनी केले होते. हे सुंदर मंदिल जैन धर्माच्या तीर्थकरांवर आधारित आहे.
विमल वसही मंदिर : प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव
लुन वसही मंदिर : २२ वे जैन तीर्थंकर नेमीनाथ
पीतलहर मंदिर : प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव
पार्श्वनाथ मंदिर : २३ जैन तीर्थंकर पार्श्वनाथ
महावीर स्वामी मंदिर : अन्तिम जैन तीर्थंकर महावीर, 
ह्यापैकी विमल मंदिर हे सर्वात प्राचीन आहे. जे १०३१ ई.स. मध्ये बनविण्यात आले होते. हे मंदिर बनविण्यात १५०० शिल्पकार आणि १२०० श्रमिकांना खूप मेहनत करावी लागली होती.दिलवाडा हे मंदिर पूर्ण होण्यासाठी १४ वर्षांचा कालावधी लागला. तर ह्याकरिता १८ कोटी रुपयांचा खर्च आला होता. ह्या पितलहार मंदिरातील ऋषभदेवाची पंचाधातुने बनलेली मूर्ती आहे. या मूर्तीचे वजन हे तब्बल ४ हजार किलोग्राम आहे.
विमल वसही मंदिर येथील आदिनाथ मूर्तीत खरे हिरे लागले आहेत. बाहेरून जरी हे मंदिर इतर मंदिरासारखे वाटत असलं तरी त्याची शिल्पकला ही अप्रतिम आहे. हे मंदिर खरचं वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे.ललित कलाकृती आणि उत्कृष्ट मूर्तीकलेचे उदाहरण
 ह्या मंदिरात बघायला मिळतात. ह्याच्या भिंतींवर आणि छतावर बारीक नक्षीकाम अतिशय बारकाईने केलेले दिसते.
ह्या मुर्त्यांवर कोरण्यात आलेले भाव अगदी सजीव असे वाटतात. एवढे वर्ष जुने असूनही ह्या मुर्त्यांवरील चमक अजूनही नव्यासारखीच दिसते. संगमरवरच्या दगडावर केलेले नक्षीकाम अत्यंत बारीक आणि सुंदर आहे. आजची आधुनिक वास्तुकला आणि शिल्पकला ह्या मंदिरातील शिल्पकलेच्या तुलनेत काहीच नाही.
दिलवाडा चे हे मंदिर बनविण्याची सुरवात ही सोलंकी राजा भीमदेवचे महामंत्री विमलशहा ह्यांनी केली. राजा भीमदेव ने चंद्रावती राजवटीत झालेले बंड नियंत्रित करण्यासाठी विमलशहा ह्यांना पाठवले होते. हे बंड शांत करण्यासाठी खूप रक्तपात केला, त्यामुळे त्यांना अत्यंत निराशा वाटू लागली. त्यांनी एका जैन साधूला ह्या पापाचे पश्चाताप कसे करू, मला ह्या पापातून मुक्त करण्याचा एखादा मार्ग सांगा अशी विनंती केली.
तेव्हा त्या जैन साधकाने विमलशहाला सांगितले की, पापातून पूर्णपणे मुक्ती मिळणे हे तसे कठीणच, पण मंदिर बनवून तू थोडं पुण्य नक्की कमवू शकतो. ह्याचीच प्रेरणा घेत विमलशहाने हे मंदिर बनविण्यास सुरवात केली. आणि त्यातून हे सुंदर, अलौकिक असे मंदिर उभारले गेले.
इनमराठी  वरून साभार. 
सोबत मंदिराचे काही फोटो पहा
____________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম