भगवान विठ्ठल अर्थात पांडुरंग.

भगवान विठ्ठल अर्थात पांडुरंग.

 व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. व्युत्पत्ती
‘डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, ‘विष्णु’ या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘बिट्टि’ असे होते आणि या अपभ्रंशापासून ‘विठ्ठल’ हा शब्द बनला.’
भगवान विठ्ठल अर्थात पांडुरंग


आ. अर्थ
१.    विट ± ठल अर्थात (स्थळ) · विठ्ठल
अर्थ : विटेवर उभा रहातो तो विठ्ठल.
२.    विदा ज्ञानेन ठान् अज्ञजनान् लाति गृह्णाति ।
अर्थ : अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल.
३. भगवान‘विठ्ठलाचे’दुसरे नाव : पांडुरंग
 ‘पांडुरंग’ हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते ‘पंढरपूर’ होय, असे डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात.
अ. श्री विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची असूनही त्याला पांडुरंग (पांढर्‍या रंगाचा) हे नाव पडण्यामागील कारणे
अ १. दह्या-दुधाचा अभिषेक केल्यामुळे विठ्ठल पांढर्‍या रंगाचा झाल्याने त्याला ‘पांडुरंग’ म्हणणे : ‘श्री विठ्ठल हा माझा अवतार आहे. त्यामुळे दह्या -दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच मी श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. शास्त्रे आणि पुराणे यांत श्री विठ्ठलाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकामुळे तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला ‘पांडुरंग’ 
असे संबोधिले जाते ..      
    अ २. श्री विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची दिसत असली, तरी खर्‍या भक्‍ताला सूक्ष्म-दर्शनेंद्रियाने ती पांढरीच दिसते. प्रत्येक मासातील (महिन्यातील) दोन एकादश्यां पैकी पहिली श्री विठ्ठलाच्या नावे आणि दुसरी पांडुरंगाच्या नावे करतात.

इतिहास
अ. २८ युगे उभा असणे

१.    सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वी तत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७  x ४ = २८. 
[सध्या २८ वे युग  चालू आहे. ]
विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.
२.    ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’
 ‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’
पंढरीच्या श्री विठ्ठलमूर्तीनेही भोगला असा वनवास !

१. प्राचीनता

‘पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची मूर्ती पुष्कळ प्राचीन आहे. ही तिसर्‍या शतकातील उदयगिरी लेण्यातील मूर्तीप्रमाणे दिसते; परंतु संतजन आणि भक्‍तगण यांच्या लाडक्या पंढरीच्या श्री विठ्ठलमूर्तीला अनेकदा वनवासी व्हावे लागले आहे.
२. विजयनगर येथे प्रतिष्ठापना
 दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याचा राजा रामराया याने खिस्ताब्द १६ व्या शतकाच्या मध्यास पंढरपूरची श्री विठ्ठलमूर्ती विजयनगर येथे नेली आणि तेथे श्री विठ्ठलाचे भव्य मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
३. पंढरपूर येथे पुनर्स्थापना
संत एकनाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी ती मूर्ती विजयनगर येथून पुन्हा पंढरपुरास आणून तिची समारंभपूर्वक मूळ ठिकाणी स्थापना केली.
४. मुसलमानांपासून रक्षण होण्याकरता मूर्ती गुप्त स्थळी हालवणे
दक्षिणेत मुसलमानांचे वर्चस्व चालू झाल्यावर श्री विठ्ठलमूर्ती आक्रमकांच्या हाती लागू नये; म्हणून खिस्ताब्द १६६९ मध्ये ती पंढरपूर येथून हलवून गुप्त स्थळी ठेवण्यात आली. नंतर खिस्ताब्द १६७२ मध्ये आषाढीवारीच्या वेळी मूर्ती ‘काडकुसुंबे’ या गावी न्यावी लागली. ती लपवून ठेवल्यामुळे आक्रमकांच्या हाती लागू शकली नाही.
५. दीर्घकाळ मूर्ती मंदिराच्या बाहेर
खिस्ताब्द १६७५ मध्ये मूर्तीची चोरी झाली. बडव्यांकडून भरपूर रक्कम घेऊन चोरणार्‍याने ती परत दिली. १६९४ ते १७१५ या कालावधीत दीर्घकाळ मूर्ती पंढरपूरच्या बाहेर अज्ञातवासात होती.
६. पंढरपुरात पुनश्च प्रतिष्ठापना १७१५ मध्ये पंढरपूरच्या मंदिरात ती पुनश्च प्रस्थापित झाली. वर्षभरात राजर्षी शाहू महाराजांनी एका अभयपत्राद्वारे ‘पंढरपूर क्षेत्राला सैन्याकडून उपद्रव होणार नाही’, अशी ग्वाही दिली. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या मूर्तीला पुनश्च वनवास भोगावा लागला नाही.’
===========================================================


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম