प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही

 प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही

  .       आज आपण जाणून घेऊया त्या पद्धती ज्यांच्या सहाय्याने ठग एटीएम कार्ड हॅक करतात, जेणेकरून तुम्ही अश्या धोक्यापासून सतर्क राहू शकाल.
❗१. स्कीमर
ज्या जागेवर एटीएम कार्ड आपण इन्सर्ट करतो, त्या जागेवर एक पातळ चिप बसवलेली जाते. ही चिप इलेक्ट्रॉनिक डेटा कॉपी करते, त्याला स्कीमर असे म्हटले जाते. या माध्यमातून तुमच्या एटीएम कार्डची सगळी माहिती हॅकरला मिळू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाल तेव्हा या गोष्टीकडे नक्की नजर टाका की, कार्ड स्वाइप करतेवेळी त्याजवळील लाईट चालू बंद होतो आहे की नाही.
जर तो लाईट पेटत नसेल तर त्यामध्ये स्कीमर असण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी कार्ड काढून चेक करावे आणि काही हॅकिंगच्या संशय आल्यास एटीएममध्ये दिलेल्या टोल फ्री नंबरला कॉल करून लगेच सूचित करावे. 

____________________________
❗२. स्पाय कॅमेरा
एटीएम मशिनच्या बरोबर वरच्या भागात स्पाय कॅमेरा लावण्यात आलेला असतो. कधी मशिनच्या वर हा कॅमेरा असतो, तर कधी मशिनच्या की– बोर्डच्या वर हा स्पाय कॅमेरा लावण्यात येतो.
यापासून वाचण्यासाठी पासवर्ड टाईप करताना, आपला दुसरा हात की – बोर्डवर ठेवून पासवर्ड टाईप करावा, त्यामुळे स्पाय कॅमेरा जरी लावला असेल तरीही तो आपल्या पासवर्ड कॅच करू शकत नाही.
❗३. किपॅडच्या वर कवर प्लेट
काही ठिकाणी तुमच्या कार्डचा पासवर्ड मिळवण्यासाठी की-पॅडच्या वर अजून एक खोटी कवर प्लेट लावण्यात येते त्यामुळे तुम्ही टाईप केलेला पासवर्ड त्यामध्ये स्टोअर राहतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
तसेच एटीएम कार्ड इंसर्ट करण्याच्या जागेवर एक पातळ पट्टी बसवली जाते, त्यामध्ये रेकॉर्डिंग कॅमेरा असतो, जो तुमची सर्व माहिती हस्तगत करतो आणि ठग खोटे कार्ड बनवून तुमच्या खात्यामधील रक्कम काढू शकतो.
❗४. एटीएम मशिनवरील संशयास्पद गोष्ट
एटीएममध्ये गेल्यावर त्या मशिनच्या कार्ड स्लॉट कडे नीट लक्ष द्या. जर तुम्हाला वाटले की, एटीएम कार्डच्या स्लॉटशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तो स्लॉट हलवला गेला आहे, तर अश्या स्लॉटचा वापर करणे टाळावे.
कसे सुरक्षित रहाल?
१. बँकेच्या एसएमएस सेवेचा फायदा घ्या, जेणेकरून कोणताही व्यवहार झाल्यावर ताबडतोब तुम्हाला सूचना मिळेल.
२. ठराविक काळानंतर आपल्या कार्डचा पिन बदलत रहा.
३. संशयास्पद न वाटणाऱ्या जागेवरच एटीएमचा वापर करा.
४. एटीएमच्या की-पॅडवरही बारकाईने लक्ष द्या.
तर मंडळी हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वत: सोबत इतरांनाही सतर्क राहायला सांगा!

╰──────•◈•──────╯ 

प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম