तब्बल 124 वर्षे जगलेले भारतीय साधू

  तब्बल 124 वर्षे जगलेले भारतीय  साधू 



https://bit.ly/3heDe3N
आपल्या देशात शतक पार करूनही अनेक वर्षे जिवंत राहिलेले अनेक योगी, साधू होते आणि आजही आहेत. केवळ हिमालयातच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी असे योगी आहेत. मात्र, अशा लोकांना भौतिक जीवनाची, प्रसिद्धीची आसक्ती नसल्याने त्यांचे हे अलौकिकत्व जगापासून दूर राहते. असेच एक योगी कोलकात्यात आहेत. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 मध्ये झाला.. त्या काळात जन्मनोंद करण्यासाठी तशी यंत्रणा नव्हती. पण मंदिरात त्यांच्या जन्माचा उल्लेख आहे. रोज दोन तास योगाभ्यास, दोन वेळा पोळी, भाजी, भात आणि वरण वा सांबार असे जेवण. बाकीचा सारा वेळ ते गीतापठनात जातो.  तब्बल 124 वर्षे वयाचे असूनही ते आजही ताजेतवाने आणि सक्रिय आहेत.
या सत्पुरुषाचे नाव आहे स्वामी शिवानंद. वयोमानाप्रमाणे त्यांचे केस पिकले, चेहर्यावर सुरकुत्या आल्या, पण देहाचे आरोग्य चांगले राहिले. तीन शतकांचे साक्षीदार असलेले हे साधू पुरुष अनेक यम-नियमांचे पालन करीत जीवन जगत राहिले आहेत. त्याचा त्यांना आध्यात्मिक लाभाबरोबरच दीर्घायुष्यासाठीही लाभ झाला.  
    नियमितपणे योगासने करणे आणि मसालेदार खाण्यापासून दूर राहणे हे त्यांनी कटाक्षाने पाळले आहे.त्यांना योगाभ्यासाच्या निमित्ताने आॅस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, लक्झेम्बर्ग, नेदरलँड अशा अनेक देशांचा दौरा केला आहे. तब्बल ५0 देशांना त्यांनी योगासनांची ओळख करून दिली. त्यांनी एकोणिसावे, विसावे व एकविसावे अशी तीन शतके पाहिली आहेत. मी जगातील सर्वात वृद्धच नव्हे, तर सर्वात आनंदी माणूस आहे, असे ते सांगतात. त्यांनी या प्रदीर्घ आयुष्यात प्लेग, फ्लू आणि आता कोरोना अशा भयानक साथी पाहिल्या आहेत.पण त्यांना मात्र कधीही कसलाच आजार झालेला नाही. इतके आयुष्य आणि तेही अतिशय आनंदाचे मिळावे असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी स्वामी शिवानंद यांनी ज्या गोष्टींचे आचरण केले, ते करणे मात्र अजिबात सोपे नाही.  सध्या त्यांचे अनुयायी त्यांच्या नावाची गिनिज बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या जपानच्या जिरोएमोन किमुरा यांचे नाव गिनिजमध्ये नोंदवलेले आहे. 2013 मध्ये त्यांचा 116 वर्षे व 54 दिवस या वयात मृत्यू झाला. त्यांच्यापेक्षा किती तरी अधिक आयुष्य हे भारतीय स्वामी जगलेले आहेत.

तब्बल 124 वर्षे जगलेले भारतीय  साधू


   Indian monk who lived to be 124 years old 
 
 There were and still are many yogis and sadhus in our country who have lived for many years even after passing a century.  There are such yogis not only in the Himalayas but in many places across the country.  However, since such people have no attachment to material life, fame, their supernaturalness stays away from the world.  One such yogi is in Kolkata.  He was born on August 8, 1896. At that time, there was no such system for birth registration.  But the temple mentions his birth.  Two hours of yoga practice daily, two meals of poli, vegetables, rice and varan or sambar.  The rest of the time he goes to Gita reading.  Despite being 124 years old, he is still fresh and active.
 The name of this saint is Swami Sivananda.  His hair grew gray with age, his face wrinkled, but his health remained good.  Witnessing for three centuries, these sadhu men have been living their lives following many Yama-rules.  It benefited them not only spiritually but also for longevity.
 https://bit.ly/2CIxJLT
     He has practiced yoga regularly and has refrained from eating spicy food. He has visited many countries like Australia, Saudi Arabia, Luxembourg and the Netherlands for the purpose of practicing yoga.  He introduced yoga asanas to over 50 countries.  They have seen the nineteenth, twentieth and twenty-first centuries.  "I'm not only the oldest person in the world, I'm the happiest person," he says.  He has seen terrible diseases like plague, flu and now corona in his long life. But he has never got any disease.  Many want so much life and so much happiness.  But for that, the things that Swami Sivananda did are not easy to do.  Currently, his followers are trying to get his name registered in the Guinness Book of World Records.  Currently, Japan's Jiroemon Kimura is listed in the Guinness Book of World Records.  He died in 2013 at the age of 116 years and 54 days.  These Indian lords have lived far more lives than him

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম