फेसबुक लिंक https://bit.ly/3aXdgj8
योगेश्वर श्रीकृष्णाचे सर्व जीवनच अनेक रोमांचक घटनांनी भरलेले आहे. ज्याच्या जन्मापासून ते देहत्यागापर्यंत अनेक कहाण्या आजही सांगितल्या व ऐकल्या जातात. कृष्णचरित्राची मोहिनी पाच हजार वर्षांचा काळ लोटूनही अजिबात उतरलेली नाही. कृष्णाच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना कांही ना काही शिकविणारी आहे.
अशा या महापराक्रमी युगपुरूषाने सौराष्ट्रातील भालका येथे देहत्याग केला व ते स्थळ म्हणूनच भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथे श्रीकृष्णाचे मंदिर असून येथे दर्शनासाठी येणार्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे. ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली श्रीकृष्ण जखमी झाले तो पाच हजार वर्षांपूर्वीचा पिंपळ आजही येथे आहे व तो कधीच सुकला नाही असे मानले जाते.
या वृक्षाखाली श्रीकृष्ण बसले असताना त्यांच्या पायाच्या तळव्याला हरणाचा तळवा समजून जरा नावाच्या शिकार्याने बाण मारला. या बाणाने घायाळ झालेल्या कृष्णानी भालका जवळच्या हिरण नदीवर प्रयाण केले व तेथेच ते पंचत्वात विलीन झाले. अर्थात या बाणाच्या जखमेमुळे आपली अवतार समाप्तीची वेळ येणार आहे याची पूर्ण जाणीव कृ ष्णाला होती कारण ते अंतर्यामी होते म्हणूनच त्यांनी बाण मारणार्या जरा शिकार्याला माफ केले होते♍.
येथे असलेल्या मंदिरात श्रीकृष्ण आणि जरा शिकारी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. सोमनाथापासून केवळ दीड किलोमीटरवर असलेल्या या स्थळी आजही कृष्णाच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात.श्रीकृष्ण जराचे सांत्वन करतांना त्याला सांगतो, ‘त्रेतायुगात मी श्रीरामावतारात असतांना तू सुग्रीवाचा भाऊ वाली होतास. त्या वेळी श्रीरामाने बाण मारून वालीचा वध केला. आता त्याची परतफेड झाली.’ श्रीकृष्ण जराला क्षमा करतो. श्रीकृष्ण त्या पिंपळाच्या झाडाखाली अवतारकार्य समाप्त करतो. आता हे स्थान ‘भालका तीर्थ’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र देहोत्सर्ग तीर्थ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.♍
योगेश्वर श्रीकृष्णाने केला होता देहत्याग
Tags
धार्मिक