सटरफटर महाराज
देव हे कर्माच्या अधीन असतात, मात्र साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात.
रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू.. ज्याचे अंत:करण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू.. निराश्रितांना हृदयी धरतो तो साधू.. आपल्या नोकरांवर पुत्रवत प्रेम करतो तो साधू..’ ही तुकोबांनी सांगितलेली साधु-संतांची व्याख्या. साधीच. पण असे साधू दिवा लावूनही दिसणे कठीणअसते.
कोणत्याही साधु महाराज यांचे नाव भारदस्त असले की भक्ताना पण बरे वाटते.पण "सटरफटर महाराज" म्हटले की नाव एेकायला वेगळं विचित्र वाटत असलं तरी या नावाचे महाराज होते.
धालेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे येथे या महाराजांची समाधी आहे.
१८७२ च्या सुमारास धालेवाडीत एक साधू महाराज आले होते. कालांतरानं हे महाराज धालेवाडीतच विसावले.शंकराच्या मंदिरात महाराज राहत असत. महाराज गावात भिक्षा मागत, पण त्याचबरोबर गावकऱ्यांना अनेक औधषोपचारांचीही माहिती देत.त्यांच्या हातगुणाने अनेकाना आराम पडे. यामुळे महाराज पंचक्रोशीत प्रसिध्द झाले.महाराज कोणाशी बोलत नसतं, काही मागत नसतं, फण अडल्यानडल्याना मदत करत असत. यामुळे अनेक भक्तांचा आोढा इकडे वळला. संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला रसाळपुर्ण वाणीने महाराज भक्तवर्गात फारच प्रसिध्द झाले होते. ,महाराजांच्या किर्तनालाही अनेक लोक येऊ लागले. या महाराजांचं नाव काय याबद्दल अनेकंना कुतूहल होतं.
अनेकांनी महाराजांकडे याबद्दल विचारणाही केली त्यावर नावात काय आहे मला म्हणा काहीतरी सटरफटर असं ते म्हणाले. आणि तेव्हापासून या महाराजाचं ‘सटरफटर’ हे नावच पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध झालं.महाराजाना नावाबाबत काहीच वाटत नव्हते.
अनेकांनी महाराजांकडे याबद्दल विचारणाही केली त्यावर नावात काय आहे मला म्हणा काहीतरी सटरफटर असं ते म्हणाले. आणि तेव्हापासून या महाराजाचं ‘सटरफटर’ हे नावच पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध झालं.महाराजाना नावाबाबत काहीच वाटत नव्हते.
चैत्र शुध्द पंचमिला त्यांची पुण्यतिथी असते.सगळी पंचक्रोशी यासाठी जमत असते.
Tags
धार्मिक