वर्षातून एकदाच उघडते ‘हे’ नागमंदिर !

 वर्षातून एकदाच उघडते ‘हे’ नागमंदिर !  


.        दि.  १५ आॅगष्ट २०२०
https://bit.ly/2PRA6yZ
     उज्जैन ः भारतीय संस्कृती ‘सर्वम् खलु इदम् ब्रह्म’ असे म्हणून सर्व भूतमात्रात एकमेवाद्वितीय परब्रह्म पाहण्याचा उपदेश करते. त्यामुळे अगदी झाडाझुडपांपासून (तुळस,वड, पिंपळ आदी) ते पशुपक्ष्यांपर्यंत (गाय, बैल, गरूड आदी) अनेक जीवांना भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय स्थान आहे.
भारतातील कृषी संस्कृतीचा यावर मोठाच प्रभाव आहे हेही स्पष्टच दिसते. धान्याची नासाडी करून शेतकर्यांचे नुकसान करणार्या उंदरांना खाणारे सर्प शेतकर्यांचे मित्रच आहेत. ,त्या तही फणा काढून डौलाने उभ्या राहणार्या नागाला तर अनेक देवदेवतांजवळ स्थान देण्यात आलेले आहे. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी होते. मध्यप्रदेशात उज्जैनमध्ये असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर मंदिरातील वरच्या मजल्यावर एक नागमंदिर आहे. हे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला खुले करण्यात येते.
या मंदिराचे नाव ‘नागचंद्रेश्वर मंदिर’ असे आहे. मंगळवारी मध्यरात्री या मंदिराचे दरवाजे 24 तासांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळी तिथे विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री मंदिराचे दरवाजे बंद केले जातील. या काळात हजारो भाविक भगवान नागचंद्रेश्वराचे दर्शन घेतात. मंदिर खुले केल्यावर महंत प्रकाशपुरी आणि उज्जैनचे जिल्हाधिकारी व महाकालेश्वर मंदिर प्रबंध समितीचे अध्यक्ष मनीष सिंह यांनी नागचंद्रेश्वराची पूजा केली.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

वर्षातून एकदाच उघडते ‘हे’ नागमंदिर !

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম