...म्हणून पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टला
https://bit.ly/3asjVBv
जगाच्या नकाशावर एका नव्या देशाची निर्मिती झाली. मात्र इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान यांना १५ ऑगस्ट १९४७ या दिवशीच स्वातंत्र्य दिले होते. असे असून सुद्धा पाकिस्तान १५ ऑगस्ट ऐवजी १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळून सुद्धा दोन्ही देश वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्य दिन का साजरा करतात? जाणून घेऊयात पाकिस्तान १५ ऐवजी १४लाच का स्वातंत्र्य दिन साजरा करते..
इंग्लंडच्या संसदेने भारताचे शेवटचे व्हॉईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे फाळणीचा आणि स्वातंत्र्याचा अंतिम अधिकार दिला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे सत्ता सोपवणेची जबाबदारी त्यांच्याकडे होती कारण तेच ब्रिटिश सत्तेचे भारतातील शेवटचे आणि एकमेव प्रतिनिधी होते. आता सत्ता सोपवायची म्हटल्यावर माऊंटबॅटन एकाच वेळी नवी दिल्ली आणि कराची (तेव्हाची पाकिस्तानची राजधानी) उपस्थित राहीले पाहिजेत. पण प्रत्यक्षात हे शक्य होऊ शकणार नाही.,तसेच पहिल्यांदा भारताला सत्ता सोपवून मग पाकिस्तानला जाणे देखील शक्य नव्हेत कारण कायदेशीर रित्या भारताकडे सत्ता सोपवल्यास ते गर्व्हरन जनरल झाले असते. त्यानंतर दुसऱ्या देशाला सत्ता देण्याचा अधिकार त्यांच्याकडे राहिला नसता.
त्यामुळे एकच पर्याय शिल्लक होता की माऊंटबॅटन पहिला पाकिस्तानला सत्ता सोपवतील. म्हणजे १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानला सत्ता सोपवतील आणि दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी भारताकडे सत्ता सोपवतील. इंडियन इंडिपेडेंस अक्ट नुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्याचा दिवस १५ ऑगस्ट हाच होता. पण पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य दिन साजरा करते.