चिक्कोडी येथील एकमेव त्रिलिंग मंदिर
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला एक आगळेवेगळे महत्व आहे. या महिन्यात स्वर्गातील देवदेवतांचे दरवाजे खुले असतात. त्यामुळे या महिन्यात भक्तांनी मनोभावे पूजा भक्ती केल्यास पुण्य लाभते व आपल्या मनोकाना पूर्ण होतात, अशी श्रध्दा हिंदू धर्मातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात भक्त आपल्या परिसरातील मंदिरांना भेट देवून दर्शन घेत असतात. अनेक भक्तांकडून प्रत्येक सोमावरी व्रत करण्यात येते. चिकोडी शहरातील श्री महादेव मंदिरातही श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भक्त दर्शनाचा लाभ घेत असतात. महादेवाचा वार सोमवार आहे. यानिमित्त शहरातील सुप्रसिध्द श्री महादेव (त्रिलिंग) मंदिराबदल थोडक्यात अख्यायिका...........
रामायण काळापासून अस्तित्वात असलेले श्री महादेव मंदिर चिकोडी शहरातील होसपेठ गल्लीत आहे. हे ऐतिहासिक मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वर्षभर या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते.https://bit.ly/342VOYP
श्री राम, लक्ष्मण व सीता वनवासाला जाताना अयोध्येहून दक्षिणेकडे निघाले होते. श्री राम हे शिवभक्त असल्याने ते रोज शिवलिंगाची पूजा करीत असत. वनवासाला जात असताना ते चिकोडी गावावरुन जात होते. त्यावेळी चिकोडी शहराच्या मध्यभागाी सद्या ओढा असलेल्या ठिकाणवरून चिकोत्रा नदी वहात होती.
यावेळी श्री राम, लक्ष्मण व सीता यानी शिवलिंगपूजा करण्यासाठी या नदीच्या काठावरील पश्चिमेकडची जागा निवडली. या ठिकाणी त्यांनी तीन शिवलिंगांची स्थापना करुन पूजा केली. त्यानंतर ते पुढे उमराणीजवळील रामलिंगकोडी, गोकर्ण व रामेश्वर असे भ्रमण करीत पुढे गेले असल्याचा इतिहास सांगितला जातो. त्यांनी शहरातील या नदीच्या काठी तीन लिंग स्थापन केली. तेच आजचे श्री महादेव (त्रिलिंग) मंदिर म्हणून ओळखले जाते.
भगवान श्री रामानी स्थापना केलेल्या या त्रिलिंग शिवलिंगाच्या ठिकाणी त्याकाळच्या जनतेने लहान दगडी मंदिर बांधले. त्यानंतर 1973 साली या परिसरात त्रिलिंग युवक गजानन मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने पहिल्यांदा या मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कार्य पाहून त्याकाळच्या जुन्या मंदिर कमिटीने मंदिराची धुरा तरुण मंडळाकडे सोपविली. पुढे 2001 साली श्री त्रिलिंग गजानन युवक मंडळ व महादेव ट्रस्ट कमिटीची स्थापना झाली. याचवर्षी मंदिरात भव्य असा लक्षदिपोत्सव साजरा करण्यात आला होता.
महादेव मंदिर कमिटीने 2001 साली या मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम हाती घेतले. यासाठी चिकोडी पंचक्रोशीतील जनतेने देणगीच्या स्वरुपात सहकार्य केल्याने भव्य असे नूतन महोदव मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर 5 व 6 ऑगस्ट 2014 रोजी मंदिराचा कळसारोहन, नंदी प्रतिष्ठापना, जिर्णोध्दार कार्यक्रम झाला. तसेच मंदिराच्या आवारात भक्त, लोकप्रतिनिधी व नगरपालिकेच्या मदतीने कल्याण मंडपाची उभारणी केली. या मंदिराची स्वच्छता, धार्मिक पावित्र्य जपण्यावर मंदिरकमिटीने भर दिला आहे. या मंदिरात रोज शिवशंकर शास्त्री हिरेमठ व प्रबय्या हिरेमठ हे पूजा विधी करीत असतात.
या मिंंदरात महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येकवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेत दर्शनासाठी शहरासह संपूर्ण तालुक्यातील लोक गर्दी करीत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 3 ते 7 पर्यंत अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते. सकाळी 8 वा. श्री मूर्तीची वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणून काढण्यात येते. त्यानंतर दिवसभर भाविक शिवनामाचा जप करीत असतात. दुसर्या दिवशी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेतात.
या मंदिरात मनोभावे पूजा करुन एखादे मागणे मागितल्यास ते पूर्ण होते.जसे नोकरी, व्यवसायातील समस्या, अपत्य न होणे यासारख्या समस्यांचे निवारण झाल्याचे अनुभव भक्त लोक सांगतात.या मंदिरात श्री राम, लक्ष्मण व सीता यांनी स्थापना केलेले त्रिलिंग आहे. एकाच ठिकाणी तीन शिवलिंग दुर्मिळच पहायला मिळत असतात.अशाप्रकारचे त्रिलिंग संपूर्ण बेळगांव जिल्ह्यात अन्यत्र पहावयास मिळत नाही. तसेच श्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याने या मंदिरास विशेष महत्व आहे.♍
Tags
धार्मिक