जपान मधील शहराला भारतीय देवी लक्ष्मी चे नाव !
https://bit.ly/33T31Lc
. दि. १४ आॅगष्ट २०२०
तो देश आहे उगवत्या सुर्यांचा देश 'जपान' आणि देवीचे नाव आहे 'लक्ष्मी'. हे शहर जपानची राजधानी टोकियोच्या जवळच आहे. याविषयची माहिती जपानचे जनरल कौन्सिल ताकायुक्ती कित्गवा यांनी दिली.
जपानची राजधानी असलेल्या टोकियोजवळ 'किचयोजी' नावचे एक शहर आहे. 'किचयोगी'चे नाव हिंदू देवी 'लक्ष्मी'च्या नावावरुन ठेवण्यात आले आहे., जपान मध्ये 'लक्ष्मी'चा अर्थ 'किचयोजी' हा आहे. याची माहिती किताग्वा यांनी बेंगळुरुमधील विद्यार्थांना व शिक्षकांना सांगितली.
जपानी संस्कृती आणि समाजवर भारताचा प्रभाव आहे. कितग्वा म्हणाले, जपान आणि भारताचे विचार वेगवेगळे आहेत.जपानमधील काही मंदिरात याचा संदर्भ पाहयला मिळतात, जे हिंदू देवी देवता यांना समर्पित करण्यात आले आहे. जपानमध्ये बर्याच हिंदू देवी देवतांची पूजा केली जाते.
*कितग्वा यांनी यावेळी सांगितले, जपानी लिपीत काही संस्कृत शब्दांचा समावेश आहे. यावरून लक्षात येते की जपानी भाषा भारतीय भाषेवर आधारित आहे. जपानमधील ५०० शब्द संस्कृत आणि तामिळमधून येतात. भाषेमुळेच जपानमधील भाषा आणि पूजा करण्याची पद्धत भारतासारखी आहे
____________________________