पाकिस्तानचे राष्ट्रगित एका हिंदुने लिहिले होते
🔹 पण नंतरच्या राजवटीने तो कवि हिंदु म्हणुन नाकारले 🔹
दि १४ आॅगष्ट २०२०
महम्मद अली जिना यांना वाटले की, सगळ्या स्वतंत्र राष्ट्रांचे स्वतःचे एक राष्ट्रगीत आहे. असेच राष्ट्रगीत आपले पण असायला हवे. त्यांनी तत्काळ लाहोर येथील रेडिओच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. सूचना केली की, २४ तासात मला पाकिस्तानातील उर्दू शायर हवा आहे. जो पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिल. पाकिस्तानमध्ये कित्येक लिहितील अशा ताकदीचे शायर होतें. मात्र, जगन्नाथ आजाद यांच्या उर्दू शायरीसमोर भल्याभल्या शायरांची तोत्री वळायची. इतकी जबरदस्त शायरी होती त्यांची. रेडियो अधिकाऱ्यांना मग त्यांचीच आठवण झाली.
जगन्नाथ आझाद यांच्याकडे फक्त ५ दिवसांचा कालावधी होता. त्यांनी आपल्या अंदाजात अशी काही लेखणी चालवली, कलम चालवले की सर्व पाकिस्तानमधील जनतेला ऐकताना अभिमान वाटला होता. त्यांना माहीत होते की आपल्या आयुष्यातील सर्वात ताकदवान असे काही तरी लिहीत आहोत. आपला स्वतः चा इतिहासाचं आपण लिहीत आहोत. त्यांचे हे गीत पाकिस्तान रेडिओने कंपोज केले आणि मोहम्मद अली जिना यांना ऐकायला दिले. त्यांनी ऐकल्या नंतर फक्त एकच शब्द वापरला की वा..! वाह!! वा..!!
१४ ऑगस्ट १९४७ च्या अर्ध्या रात्री लाहोर रेडिओवरून पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत प्रसारित झाले होते. त्यावेळी ते राष्ट्रगीत ऐकुन जिनांच्याही अंगावर काटा उभा राहिला होता.
🔅त्या गीताच्या सुरुवातीच्या ओळी अशा आहेत –
*ऐ सरज़मी ए पाक जर्रे तेरे हैं आज सितारो से तबनक*
*रोशन है कहकशाँ से, कहीं आज तेरी खाक*
पाकिस्तानमधील जनतेची छाती अभिमानाने भरून आली होती. कारण, त्यात राष्ट्रास्तुती होती. तीही भन्नाट शब्दांत. या सगळ्या सगळ्या प्रेरक, स्फूर्तिदायी राष्ट्रगीताच्या ओळी होत्या.
त्यांचे हे गीत फक्त १८ महिने पाकिस्तानचे राष्ट्रगीत राहिले. कारण पाकिस्तान मधील नेत्यांना आणि शायरी लिहिणार्यांना हे राष्ट्रगीत काट्यासारखे टोचत होते.
एका हिंदूने आपले राष्ट्रगीत लिहिले आहे. हेच त्यांना पटत नसे. या वाईट वाटणाऱ्या गोष्टीची जगन्नाथ आझाद यांनी कधीही कुठेही वाच्यता केली नव्हती. या गोष्टीची चर्चा केली नव्हती. मात्र, त्यांच्या मुलाने या गोष्टी एका मुलाखतीमध्ये हे सांगितल्यावर त्यावर पुरावे शेधाण्याचे प्रयत्न जागतिक माध्यमांनी केले. त्यांना तोंडी पुरावे सापडले. मात्र, लेखी काहीच नाही
त्यांचे लिखाण पण खूप तगडे होते. त्यांनी ७० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. उर्दूवर त्यांनी जितके प्रेम केले तितकेच काम केले. तिला अजुन संपन्न कसे करता येईल या दृष्टीने काम केलं.
जग्ननाथ आझाद यांचा जन्म ५ डिसेंबर १९१८ रोजी सध्या पाकिस्तानध्ये मियांवाली जिल्ह्यातील इसाखेल गावात झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण तिथेच झाले. उच्च शिक्षण रावळपिंडी आणि नंतर लाहोर येथे झाले. त्यांचे पाकिस्तानातील शेवटचे वास्तव्य लाहोर येथे होते. त्यांचे लाहोरवर विशेष प्रेम होते. हे सर्व प्रदेश पाकिस्तानात गेल्यामुळे आझाद यांना लाहोर सोडावे लागले व भारताचा आश्रय घेणे भाग पडले. निर्वासिताचे जिणे त्यांच्या वाट्याला आले.
त्यांचा मृत्यू भारतात २००४ या वर्षी झाला..! धार्मिक असो की वांशिक कोणतीही कट्टरता समाजाला आणि महत्वाचे म्हणजे शिकलेल्या कवी, लेखक, कलावंत आणि प्रशासनालाही किती अंधभक्त बनवते त्याचाच हा खऱ्या अर्थाने वस्तुपाठ आहे.
आता त्याचे काहीच पुरावे पाकिस्तानने ठेवलेले नाहीत. हुकुमशाही राजवटी काहीही करू शकतात. मग त्या कोणत्याही देशाच्या असोत. त्याचाच हा नमुना आहे..!
Tags
माहिती