मंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही!

मंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही! 

https://bit.ly/31O6acx

    मंगळ या ग्रहावर गेल्या काळापासून अनेक बुचकळ्यात टाकणाऱ्या गोष्टी आढळल्या आहेत आणि मुख्य म्हणजे या गोष्टींचा काडीचाही सुगावा वैज्ञानिकांना लागलेला नाही हे नवल!
🔹१) आयताकृती वस्तू
२०१२ मध्ये एका अंतराळ संशोधकाला विचित्र आयाताकृती वस्तू मंगळाच्या पृष्ठभागावर दिसली होती. त्याचा अजून उलगडा झालेला नाही. ही वस्तू ऑब्जेक्ट सुमारे ५ मीटर लांबीची होती. अशा प्रकारच्या अनेक विचित्र वस्तू मंगळाच्या पृष्ठभागावर आढळून आल्या आहेत.

मंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही!

🔹२) मानवी प्रतिकृती
मंगळाच्या पृष्ठभागावर मानवी आकाराची प्रतिकृती दिसून आली होती. याचेही रहस्य अजून गुलदस्त्यात आहे. त्यावरुन पडदा उघडलेला नाही
🔹३) रहस्यमयी आकृती
कारच्या आकाराचे नासाचे रोबोटीक रोव्हर जेव्हा मंगळावर उतरले तेव्हा काही मिलिसेकंदांसाठी कॅमेरा सुरु करण्यात आला होता. तेव्हा क्षितिजावर रहस्यमयी आकृती दिसली होती. दोन तासांनी हाय रिझोल्युशन फोटो घेतल्यावर मात्र ही आकृती गायब झाली होती.
🔹४) महाकाय बोगदा
२००७ मध्ये नासाच्या मार्स ऑरबिटरने हा महाकाय बोगदा शोधून काढला होता. त्यामागचे रहस्य अजूनही रहस्य आहे. तो कसा निर्माण झाला असावा, यासंदर्भात शोध सुरु आहे. सुमारे ४९० फुट रुंदीचा हा बोगदा आहे. यात जीवसृष्टीचे पुरावे सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🔹५) प्रकाशाची रेघ
३ एप्रिल २०१४ रोजी क्युरिऑसिटी रोव्हरला क्षितिजावर जमिनीकडून आकाशाकडे झेपावणारी प्रकाशाची रेघ दिसली होती. याचा उलगडा अद्याप झालेला नाही. स्टिरिओ कॅमेऱ्याच्या उजव्या डोळ्याने हा फोटो घेतला होता. परंतु, डाव्या डोळ्याने घेतलेल्या फोटोत प्रकाशाची ही रेघ दिसलेली नव्हती.,या रहस्यांचा सुगावा लावण्यात जगभरातील सर्वच अग्रगण्य अवकाश संस्था गुंतलेल्या आहेत. भारताच्या इस्रोने देखील एक मानवरहित यान मंगळाच्या कक्षेत पाठवले आहे. जे मंगळाची वेगवेगळ्या भागांची छायाचित्रे आपल्याला पाठवत असते.
हे यान पाठवण्यामागे मंगळ ग्रहाच्या लपलेल्या बाजूंचा शोध घेणे हा मुख्य उद्देश आहे. इस्रो प्रमाणे अमेरिका आणि रशिया यांनी देखील आपली याने मंगळ ग्रहावर पाठवून विविध कोनांतून छायाचित्रे मिळवली.
पण होतं असं की ही सर्व छायाचित्रे वेग्वागेली माहिती दर्शवतात. त्यामुळेच मंगळ ग्रहाचे नेमके रहस्य उलगडणे कठीण होऊन बसले आहे.

__________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম