⭕ गोबर गॅस ⭕
_________________________
माहीती सेवा गृप पेठवड़गाव
_________________________
https://bit.ly/3kJ8gDi
गोबर गॅस सुमारे 1970 च्या दशकात देशात, राज्यात अनेक ठिकाणी दिसायला लागले. खादी ग्रामोद्योग आयोग या निमसरकारी संस्थेने याचा प्रसार आणि प्रचार अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण देशभर केला. मुळात हा धोरणात्मक निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला होता त्याचे खरे कारण ""गोबर गॅस प्लांट'' हे नव्हतेच. उलट जनावरांच्या शेणाची योग्य वासलात लावण्याची एक आदर्श व्यवस्था असे म्हणता येईल. यात मिळणारा गोबर गॅस बोनस होता. पारंपरिक पद्धतीने उघड्यावरच शेण टाकल्यामुळे त्यावर माश्या आणि डास बसतात, शेणाच्या विघटनातून वायू निर्माण होतात. या सर्व प्रकारातून रोगराई पसरते. या सर्वांवर प्रभावी उपाय म्हणजे गोबर गॅस प्लांट.
...असा तयार होतो गोबर गॅस
गोबर गॅस तयार होणं ही एक शेणाच्या नैसर्गिकरीत्या होणाऱ्या विघटनाची पायरी आहे. जनावरांच्या शेणामध्ये त्यांनी खाल्लेला चारा, कडब्याचे अंश असतात. तसेच त्यांच्या पोटातून बाहेर पडणारे विनॉक्सी जिवाणू असतात. हे जिवाणू शेणामध्ये त्यांचे अन्न शोधून उपजीविका करतात. मुळात या जिवाणूचं अन्न काय हे तपासायला लागलो तर लक्षात येतं की हे खातात फक्त पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा. शेणामध्ये या पदार्थांचं प्रमाण अतिशय अल्प असतं आणि याला कारणही तसंच असतं. गाई, म्हशींना चारा दिल्यावर तीन पदार्थ बाहेर येतात ते म्हणजे मूत्र, शेण आणि दूध. बैलाच्या बाबतीत त्याची ताकद आपल्या उपयोगाची ठरते. गाई, म्हशींच्या दुधाचं पोषणमूल्य लक्षात घेता, बाहेर पडलेल्या शेणात फक्त चोथाच असतो, हे सहजी पटण्यासारखे आहे. तरी त्याच शेणात हे जिवाणू आपले
अन्न शोधत असतात.
आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर एक किलो शेणापासून सुमारे 40 लिटर बायोगॅस तयार होतो तोही 40 दिवसांत म्हणजे विघटनाचा कालावधी सुमारे सहा ते सात आठवड्यांचा. त्यामानाने गोबर गॅस अगदीच कमी, अगदी एल.पी.जी. गॅसच्या भाषेत सांगायचे झाले तर फक्त 18 ग्रॅम गॅस. साधारणपणे प्रति जनावर दररोज सुमारे 10 ते 12 किलो एवढे शेण मिळते आणि त्यापासून गोबर गॅस तयार होतो सुमारे 400 ते 480 लिटर.♍
Tags
जनरल नॉलेज