शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय

शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ________________________
https://bit.ly/3kKpqjG
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावात शंभर वर्षांपासून चालत असलेले ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ आहे. ती वास्‍तू त्‍या गावाचे वैभवच! शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल करणारे रायगड जिल्ह्यातील ते एकमेव वाचनालय आहे.
शहाबाजला प्राथमिक शाळा १८६५ साली सुरू झाली! शाळेत सातवीचा वर्ग १८९९ साली आला. प्राथमिक शाळा पूर्ण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी १९०१ पासून सातवीच्या प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यात प्रथम श्रेणीत पास होण्याचा मान मिळवला. शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र बनले.
शंभर वर्षापूर्वी ‘सामुहिक वाचनास बंदी’ होती अस कुणी सांगीतल तर त्यावर आजची पिढी कदाचित विश्वस ठेवायला तयार होणार नाही. परंतू शंभर वर्षापूर्वी वास्तव होते. भारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामुहीक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर तत्कालीन ब्रिटीश सरकारची बंदी होती आणि तसे कुणी केले तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला जात असे व संबंधीत व्यक्तीही शिक्षेस पात्र ठरत असे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यांतील आगरी समाजाच्या शहाबाज गावांत तत्कालीन आगरी युवकांनी विचार स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने 3 एप्रिल 1916 रोजी सार्वजनीक वाचनालयाची स्थापना करुन आपल्या स्तरावर ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची मूहूर्तमेढच रोवली.
सातवी पास झालेल्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळण्याची सोय असल्यामुळे शहाबाज गावास 'जिल्ह्याला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव' अशी प्रसिद्धी मिळाली.
पुढे कमळ विठू पाटील या निर्भीड व्यक्तीने केसरी, सुधारक, संदेश अशी वर्तमानपत्रे गावात आणून त्यांचे सामुदायिक वाचन भैरवनाथाच्या मंदिरात सुरू केले. लोकांची आवड व उत्साह पाहून, हरी जोमा पाटील यांनी ‘विद्यार्थी मंडळा’ची स्थापना केली. त्या मंडळात चाळीस-पन्नास विद्यार्थी सामील झाले. गावातील सुशिक्षित लोकांनी त्या वाचन चळवळीला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. त्या लोकांनी गावातील शिक्षणप्रेमी, दानशूर, उदार नेत्यांच्या सहकार्याने ३ एप्रिल १९१६ रोजी विठोबा राघो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काशी विश्वेश्वर मंदिराच्या माडीवर ‘सार्वजनिक मोफत वाचनालया’ची मुहूर्तमेढ रोवली.
शहाबाज वाचनालयाची स्थापना झाली. पहिल्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून व्यवसायाने खोत असणारे विठोबा राघोबा पाटील यांची निवड करण्यात आली. बाळा जानू पाटील (उपाध्यक्ष),हरी जोमा पाटील(सचिव),कमळ विठू पाटील(खजिनदार) तर कमळ राघो पाटील,नारायण जाखू भगत,नथू राघो बैकर हे सदस्य असे पदाधिकारी होते.
🔹मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्नी बाळासाहेब खेर  यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्धाटन
काशिविश्वेश्वराच्या मंदिरात 1916 सालापासून सुरु  असलेल्या वाचनालयास पुस्तक खरेदीसाठी व इतर साहित्य खरेदीसाठी मंगळराव रामजी म्हात्ने (मुंबई)यांनी भरीव आर्थिक मदत केली, त्यामुळे 1926 सालापर्यंत वाचनालय हे सार्वजनिक वाचनालय ‘मंगळराव मोफत वाचनालय शहाबाज’ या नावाने ओळखले जायचे. दरम्यानच्या काळात वाचन चळवळीने अधिक जोर धरला

शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম