आसावरी : शंकर महादेवची बहिण

आसावरी : शंकर महादेवची बहिण


.        दि.  २० आॅगष्ट २०२०
https://bit.ly/2CHcmuf

शंकर म्हणजेच महादेव हा अनादी अनंत आहे. त्याला कोणी नाही. पण एका दंतकथेनुसार शंकराला बहिण होती. हो… शंकराला बहिण होती. ती त्याने पार्वतीच्या हट्टापायी निर्माण केली. जेव्हा पार्वती देवी लग्न होऊन कैलास पर्वतावर आली, त्यावेळी तिला तिच्या माहेरची, तिच्या बहिणींची आठवण यायची. त्या आठवणीने ती व्याकुळ व्हायची.तेव्हा महादेवाने नंदीला तिची काळजी घेण्यास सांगितले. पण पार्वतीला कुणीतरी समवयस्क महिला तिच्या सोबत असावी असं वाटायचं. जेणेकरून तिच्या बहिणीची आठवण तिला येणार नाही. विशेषतः महादेव तपस्येला दूर जंगलात गेले असता पार्वती देवीला एकटेपणा नकोसा वाटायचा.
आसावरी : शंकर महादेवची बहिण

   शंकराने देवी सरस्वती सोबत पार्वतीला राहण्यास सांगितले. परंतू देवी सरस्वतीचा जगभर दौरा असतो. तसंच ती खूप व्यस्त असून ती ब्रम्हदेवाची पत्नी आहे.
(ब्रम्हदेवाला सरस्वती नावाची मुलगी होती पण तो भाग वेगळा)
 त्यामुळे पार्वती देवी जास्तवेळ सरस्वती देवी सह घालवू शकत नाही. पार्वतीने एक समवयस्क महिला हवी असल्याचे महादेवाला सांगितले. तसंच त्या महिलेची आपण कायम काळजी घेऊ असे वचनही तीने महादेवाला दिले.तिचा हा हट्ट आणि एकटेपणा लक्षात घेत  शंकराने शक्कल लढवत तिच्या सोबतीला एक स्त्री देण्याचे ठरवले. त्याने त्याची शक्ती वापरत त्याच्याच सारखी एक मुलगी तयार केली. तिचे नाव आसावरी. ही आसावरी शंकराची बहिण होती. शंकराप्रमाणेच ती देखील प्राण्यांचे कातडे परिधान करायची. केस मोकळे सोडायची. तिच्या पायाला अनेक भेगा होत्या.
शंकराने आसावरी ची निर्मिती केल्यावर तिला देवी पार्वतीची ओळख करून दिली व तिच्या निर्मिती मागचे कारण सांगितले. शंकराच्या या कृत्याने पार्वती हर्षोल्हासित झाली. आनंदून गेली. पार्वती देवी तिला चवदार भोजन करून खाऊ घालायची. परंतू असावरी इतके जेवण जेवायची की तिची भुक भागवण्यासाठी संपूर्ण कैलास पर्वतावरील अन्न संपत असे.
असावरीची भुक भागवताना पार्वती दमुन जाई. एकदा शंकर तपस्येला गेले असता असावरीला भुक लागली होती. तिची भुक भागवता भागवता पार्वती मेटाकुटीला आली होती. तसेच कैलाश पर्वतावरचे सर्व जेवण संपले होते. तिची तक्रार शंकराकडे करायला पार्वती निघाली असता असावरीने पार्वती देवीला पायांच्या भेगांत लपवले. शंकराला अंतरज्ञानाने ही गोष्ट कळाली. त्याने असावरीला पार्वती कुठे आहे असे विचारले. तेव्हा असावरीने माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर शंकराने असावरीला दमात घेऊन तुच तिला लपवले असून लवकरात लवकर समोर आण असे सांगितले, तेव्हा तिने पायांच्या भेगांतून पार्वतीला बाहेर काढले.
असावरीच्या अशा वागण्याला पार्वती देवी कंटाळली होती. तीने असावरीला कैलास पर्वत सोडण्यास सांगितले. पण शंकराने तिच्या वचनाची आठवण करून दिली. देवी पार्वतीने असे वचन दिले होते की ती सदासर्वकाळ असावरीची काळजी घेईल. पण हे वचन पाळण्यास पार्वती देवी असमर्थ असल्याचे तीने शंकराला सांगितले व असावरी कैलास पर्वतावर नको असल्याचे सांगितले.
शंकराने असावरीमध्ये चांगले गुण देण्याचे ठरवत तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पार्वती देवी म्हणाली की, “असावरी जर माझ्याशी नम्रपणे बोलणार असेल व विनम्रतेने वागणार असेल तरच तिला कैलास पर्वतावर राहू दे”. तेव्हा शंकराने पार्वतीची ही विनवणी नकारली व सांगितले की, “जर तुम्ही कोणाच्या वाईट वेळेत त्यांच्या जवळ नसाल तर त्यांच्या चांगल्या समयी त्याव्यक्तीच्या जवळ जाण्याचा अधिकार तुम्हाला नाही”. इतकचं बोलून महादेव थांबले नाहीत. तर ते पुढे म्हणाले की “रक्ताचं नातं नसलेल्या दोन महिला एकाच छताखाली जास्तवेळ एकत्र राहू शकत नाहीत”.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম