मुलांची नावे..गुगल, सुप्रीम कोर्ट, ओबामा!

मुलांची नावे..गुगल, सुप्रीम कोर्ट, ओबामा!

फेसबुक लिंक http://bit.ly/3eTddbK
भलतीसलती नावे असलेली माणसं काही कमी नाहीत. अर्थात नामकरण हे संबंधित व्यक्ती पाळण्यात असतानाच होत असल्याने त्याबाबत त्याची मर्जीचा विचार होत नाही. अगदीच हास्यास्पट, खटकणारे नाव असेल तर अनेकजण नंतरच्या काळात ते रितसर बदलूनही घेतात. कर्नाटकात बंगळूरजवळील हाक्कीपिक्की नावाचा एक आदिवासी समुदाय आहे. त्यांच्या मुलांची नावे तर अतिशय विचित्र वाटणारी असतात. त्यांच्या मुलांमध्ये कुणी ‘अमिताभ बच्चन’ असू शकतो तर कुणी ‘ओबामा’. ‘गुगल’पासून ‘काँग्रेस’ पर्यंत कोणतेही नाव मुलाला असू शकते!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,हाक्कीपिक्की समुदायाचे लोक आधी जंगलातच राहत असत. कालांतराने हे लोक बंगळूरजवळील बहादूरपूर गावातश जाऊन राहिले. त्यांच्यामधील अनेक नियम आजही थक्क करणारेच आहेत. सध्याच्या काळातील काही प्रसिद्ध वस्तू, नावे किंवा संकल्पना ते आपल्या मुलांना ‘नाव’ म्हणून देतात. विशेष म्हणजे हे लोक वेगवेगळ्या चौदा प्रकारच्या भाषांचा बोलण्यात वापर करतात. आता एखाद्या घरातील आई आपल्या लाडक्या लेकराला ‘गुगल, बाळ इकडे ये’ हे कसे म्हणत असेल किंवा एखादा कातावलेला बाप आपल्या चिरंजीवाला ‘कार्ट्या स्मार्टफोना, ऐकू येत नाही का?’ ही लडिवाळ हाक कशी मारत असेल हे पाहणे रंजकच आहे!♍



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম