एका हनिमूनमूळे पडला नागासाकीवर अणुबॉम्ब
. दि. ११ आॅगष्ट २०२०
http://bit.ly/2Vg6r91
जगातील एक भयानक युद्ध म्हणून दुसऱ्या महायुद्धकडे पाहिलं जात . पण या युद्धाबद्दल एक मोठं खुलासा झाला आहे पहा काय आहे ते ,दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याच्या आठवणींनी आजही जपानच्या लोकांच्या अंगावर शहारे येतात. खरे म्हणजे अमेरिकेच्या यादीमध्ये नागासाकी हे शहरच नव्हते. विश्वास बसणार नाही, पण एका मंत्र्याच्या हनिमुनच्या आठवणींमुळे ऐनवेळी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.
अमेरिकेच्या हवाईदलाने 6 ऑगस्ट, 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला. यानंतर तीन दिवसांनी नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकून जपानला नेस्तनाभूत करण्यात आले होते. या घटनेबाबत अनेक खुलासे आता समोर येत आहेत.
अमेरिकेमध्ये अणुबॉम्ब बनविण्यात आला होता. मात्र, तो जपान पर्यंत नेणे धोकादायक होते. दुसऱ्या युद्धामध्ये नाझी फौजा, जपानचे सैन्य वरचढ ठरत होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यातच अमेरिकेमध्ये हा अणुबॉम्ब जोडल्यास तो अमेरिकेतच फुटण्याचा धोका होता. या मुळे शत्रुच्या प्रदेशात गेल्यानंतर मोठ्या विमानातच तो जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या विमानाचे नाव होते एनोला गे. याचबरोबर विमानात 12 सायनाईड या अतिजहाल विषाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. अमेरिकेचे हे ऑपरेशन फसले असते किंवा हवाई दलाचे सैनिक पकडले गेले असते तर त्यांना या गोळ्या खाऊन मरण पत्करण्याचे आदेश होते.
जपानच्या कोणत्या शहरांवर अणुबॉम्ब टाकायचे, याची यादीही बनविण्यात आली होती. यात नागासाकीचे नावही नव्हते. या यादीमध्ये कोकुरा, हिरोशिमा, योकोहामा, निगाटा आणि क्योटो ही शहरे होती. 25 जुलै रोजीच क्योटो या शहराऐवजी नागासाकीचे नाव बदलण्यात आले. याचा किस्साही तसाच गमतीशीर आहे.
अमेरिकेचे तत्कालीन युद्ध मंत्री हेन्री एल स्टिमसन यांनी ऐनवेळी नागासाकीचे नाव यादीमध्ये बदलले. कारण असे होते की, स्टिमसन यांनी क्योटो शहरामध्ये आपले हनीमून केले होते. यामुळे या शहराशी ते भावनिकदृष्या जोडले गेले होते. या शहराशी जोडलेल्या आठवणींमुळे त्यांनी क्योटो ऐवजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला होता. एका हनीमूनमुळे क्योटो शहराचा विध्वंस वाचला होता.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛