सांगलीचा आयर्विन पुल
http://bit.ly/2VdVFQE
दि. ११ आॅगष्ट२०२०
सन १९१४ ला सांगलीत महापुर आला त्यावेळची गोष्ट आहे.कृष्णेचा महापुरामुळे सांगलीचा संपर्क तुटला होता. कोल्हापुर व तळ कोकणाशी होणारा व्यापार उदीम थंडावला होता. त्यावेळी सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी निर्णय घेतला महापुराच्या या कटकटीतुन कायमचा मार्ग काढायचा.
कृष्णेचा या महापुरामुळे जनजिवन विस्कळीत होत होतं. त्यांनी आपल्या दरबारातल्या इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि सांगलीच्या स्टेट असेंब्लीत एका पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यांच्या मनात होतं प्रचंड असा पुल बांधायचा.
पण इंग्रजाचे राज्य असल्याने त्यांनीही हो ना करत अनेक वर्ष घेतली खर्चाचा प्रश्न होताच.पुलास अंदाजे साडेसहा लाख खर्च अपेक्षित होता. संस्थानचा इतर खर्च पाहता पैसा अपुरा पडत होता. अन्य कामे यामुळे थांबवावी लागणार होती. राजेसाहेबानी तर फारच मनावर घेतले होते.दिल्ली पर्यन्त पत्रव्यवहार झाला. शेवटी १९२७ साली पुलाला मंजुरी मिळाली.व पुलाचे काम पुण्यातील त्यावेळची प्रसिध्द रानडे कंपनिस हे काम देण्याचे ठरले.
पायाखुदाई चिंतामणराव पटवर्धनांच्या हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी करण्यात आली, व १६ एप्रिलला चिंतामणराव आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. पुढे २ वर्षे ९ महिन्यात हा भव्य आणि सुंदर पूल बांधून तयार करण्यात आला.पुलाला त्यावेळच्या गाॅथिक शैलीचा प्रभाव जाणवतो. नदीच्या तळापासून याची उंची जवळपास ७० फुट आहे. एकूण तेरा मजबूत खांबावर हा पूल उभा आहे. यातीलच एका खांबावर नदीच्या पातळीचे वेगवेगळे माप लिहून ठेवली आहेत.हा पूल बांधताना पटवर्धन राजांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने पूररेषेचा अभ्यास केला होता. जर अख्खी सांगली बुडली तरचं हा आयर्विन पूल बुडेल यावरून पाण्याची पातळी समजुन येते. आजही आयर्विन पुलावर पाणी किती आहे त्यावरून महापुराचा अंदाज लावला जातो. या पुलाला तत्कालीन व्हॉइसरॉय आयर्विन यांचे नाव देण्याचे ठरले.
१८ नोव्हेंबर १९२९ रोजी भारताचे व्हाईसंरॉय एडवर्ड लिंडलेवुड उर्फ बॅरन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल आणि त्यांची पत्नी उद्घाटनासाठी सांगलीला आले.उदघाटनला सांगलीच्या पंचक्रोशीतुन जनसागर लोटला होता. भव्य समारंभांनंतर हा आयर्विन पूल सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला.
९० वर्षानंतरअजुनही हा पुल ताठपणे उभा आहे. वयाची पुटंही दिसतात खरचं तो आता थकतं चाललाय.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498 ☜♡☞
‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ‼
__________________________
Tags
माहिती