भारतात अनेक गणिति होऊन गेले. त्यापैकी अलिकडील काळातील गणितितज्ञ म्हणुन दत्तात्रय रामचंन्द्र कापेरकर यांचे नाव घ्यावे लागेल.
दत्तात्रय कापेरकर यांचा जन्म १७ जानेवारी, १९०५ रोजी डहाणूत झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले.त्यांचे वडील कारकून होते. आई गृहिणी होती. मात्र काप्रेकरांच्या वडिलांना ज्योतिषशास्त्राचे फार वेड होते. ते आकडेमोड करून घडणाऱ्या घटनांबद्दल भाकित करत. त्यामुळे त्यांना अंकशास्त्राचीही गोडी होती. त्यांनी अंकशास्त्राची आवड छोट्या दत्तात्रेयालासुद्धा लावली. त्यामुळे दत्तात्रेय लहान वयापासूनच गणिती कोडी सोडवण्यात रमू लागले. अत्यंत हुशार विद्यार्थी होते ते. महाविद्यालयीन जीवनात त्यांना रँग्लर परांजपे पुरस्कार मिळाला. कापरेकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाणे येथे, तर उच्चशिक्षणाची सुरुवात मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयापासून झाली. ते १९३० साली पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून बी.एस्सी. झाले.नंतर ते नाशिक जवळ देवळालीत शिक्षक झाले.ज्या फर्गसन महाविद्यालयातून कापरेकरांनी पदवी घेतली, तेथे रँ.महाजनी अध्यक्ष व श्रोतृवृंदात प्रा.मो.ल. चंद्रात्रेय, अशा सभेत व्याख्यान द्यायची कापरेकरांना संधी मिळाली.त्यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचेधोतर, कोट, टोपी अशा त्या काळातील वेशातील ही व्यक्ती गणितात एवढी पारंगत असेल असे वाटायचे नाही. त्यांनी १९६२पर्यंत अध्यापन केले.
नोकरीत असताना आणि निवृत्ती नंतरही त्यांनी आकड्यांशी खेळणे सोडले नाही. अनेकांच्या वाट्याला येते तशी त्यांनाही या छंदासाठी सहकाऱ्यांकडून टीका ऐकावी लागली.काहीच्याकडुन थट्टा झाली पण कापेरकर सर कायम गणितात रमलेले असायचे.
🔹‘कापरेकर स्थिरांक’🔹
त्यांचे गणितातील सर्वोत्तम योगदान म्हणजे ‘कापरेकर स्थिरांक’ हे होय. कोणतीही चारअंकी संख्या घ्या. त्यातील अंक चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहा. त्यांची वजाबाकी करा. अंतिम उत्तर ६१७४ इतके येते, हा शोध कापरेकर यांनी प्रसिद्ध केला. या त्यांच्या शोधाची दखल मार्टीन गॉर्टन यांनी घेतली. त्यावर त्यांनी आपला लेख ‘सांयटिफिक अमेरिकन’च्या मार्च १९७५च्या अंकात प्रसिद्ध केला. नंतर ६१७४ या संख्येला ‘कापरेकर स्थिरांक’म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी ‘दत्तात्रेय संख्या’ही शोधून काढल्या.
दत्तात्रय संख्येच्या वर्गाचे दोन किंवा आधिक भाग केले तर तो प्रत्येक भाग हा पूर्णवर्ग असतो. १३, ५७, १६०२, ..... अशा या संख्या आहेत.
६१७४ या संख्येला 'कापरेकर संख्या/स्थिरांक' म्हणतात.
🔅हा स्थिरांक मिळवण्याची पद्धत :-
कुठलीही चार अंकी संख्या घ्या( कमीतकमी २ वेगवेगळे अंक असायला हवेत)
त्यांचा चढता क्रम लावा (यातून एक ४ अंकी संख्या तयार होईल.
आता त्यांचा उतरता क्रम लावून एक संख्या तयार करा ( यातून एक ४ अंकी संख्या तयार होईल
आता मिळालेल्या संख्यांमधून छोटी संख्या मोठ्या संख्येतून वजा करा
आता क्रमांक २,३,४ परत करा
🔅उदाहरणार्थ :-
संख्या - ३२१५
चढता क्रम - ५३२१
उतरता क्रम - १२३५
आता वजाबाकी करा - ५३२१-१२३५ = ४०८६
आता हीच प्रक्रिया पुन्हा करा
८६४०-०४६८ =८१७२
८७२१-१२७८ = ७४४३
७४४३-३४४७ =३९९६
९९६३-३६९९ =६२६४
६६४२- २४६६ =४१७६
७६४१- १४६७ =६१७४
आता यांनंतर परत कितीही वेळा ६१७४ हाच अंक येईल
हा स्थिरांक दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांनी शोधून काढला
उदाहरणार्थ, ५७ या संख्येचा वर्ग ३२४९ येतो. या संख्येचे ३२४ आणि ९ असे दोन भाग केल्यास या संख्या १८ आणि ३ या संख्येचे वर्ग आहेत.
त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ‘दत्तात्रय’ नावाच्या संख्येचा शोधही लावला. दत्तात्रयात ब्रम्हा, विष्णू, महेश अशा तीन देवता आहेत; तसेच, तीन वर्गदर्शन देणार्या संख्याही गणितात आहेत हे कापरेकर यांनी शोधून काढले. उदाहरणार्थ, 49 या संख्येत 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग आहे 9; तसेच, 7 चा वर्ग 49 हाही अंतर्भूत आहे.
🔅कापरेकर यांनी शोधलेल्या ‘दत्तात्रय’ संख्या म्हणजे नक्की काय?🔅
दत्तात्रय संख्या
13, 57, 1602, 40204 या संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात. कारण, त्या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यांतील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो.
उदाहरणार्थ, 13²=169.(16 आणि 9 हे पूर्ण वर्ग आहेत.)
57²=324।9;
1602²=256।64।04;
40204²=16।16।36।16।16
कॅलक्युलेटर हे दहा किंवा बारा डिजिटचे असतात; तर कापरेकर यांनी इतके गुणाकार-भागाकार करण्यासाठी किती वेळ खर्च केला असेल आणि तेही अत्यंत अचूकपणे व कंटाळा न करता..... म्हणूनच त्यांचे नाव प्रख्यात गणितज्ञ म्हणून ‘द वर्ल्ड डिरेक्टरी मैथेमेटिशियन’ या स्वीडनहून प्रकाशित झालेल्या ग्रंथात समाविष्ट झालेले आहे.Stefanu Elias Aloysius या लेखकाने "D.R. Kaprekar’ नावाचे कापरेकरांचे चरित्र लिहिले आहे.
अशा या गणिति तज्ञाचे १९८६ मध्ये देवळाली येथे निधन झाले.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498