मोडवेचा पुरंदरे वाडा
अष्टविनायकांपैकी ‘मयुरेश्वर’ या गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी आहे. अष्टविनायकांपैकी तो पहिला गणपती आहे. त्या स्थळाचे दर्शन ‘अष्टविनायक’ या चित्रपटात होते. त्याच गावाजवळ ‘करंजे’ येथे सोमेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे श्रावणी सोमवारी जत्रा भरते. त्या स्थळाचे दर्शन ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटातून झाले आहे. ते गाव सोमाईचे करंजे म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या जवळ मुर्टी-मोडगाव या गावी ऐतिहासिक पुरंदरे वाडा मात्र फार ज्ञात नाही.
पुरंदरे वाडा चार भक्कम बुरुंजावर मजबूत स्थितीत उभा आहे. वाड्यांच्या वास्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनंतर म्हणजे साधारणपणे १७६० ते १७७० च्या दरम्यान बांधल्या गेल्या असाव्यात. दोन्ही वाड्यांचे बांधकाम करणारे कामगार एक असावेत.
वाड्याच्या बांधकामास खाली काळा पत्थर व वर सुबक विटा वापरल्या आहेत. वीटकाम सुबक आणि सुस्थितीत दिसते. तटबंदीच्या भिंतीत जंग्या ठिकठिकाणी आहेत. ते बुरूज नवीन असल्यासारखे वाटतात. बुरुजांची उंची आठ-साडेआठ मीटर आहे. बुरुजांना जोडणारी तटबंदीची भिंत दोन ते तीन मीटर रुंदीची आहे. बुरुजावर चुन्याचा स्लॅब ओतलेला असून तो सुस्थितीत आहे. चारचाकी वाहन त्याच्यावरून सहज जाऊ शकेल.♍
Tags
गडकिल्ले