गंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू

गंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू

http://bit.ly/3lAMaFW
गंजिफा हा पत्त्यांच्‍या साह्याने खेळला जाणारा खेळ.
सावंतवाडीत त्‍या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्‍याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात असे.
आंध्र व तेलंगण प्रांतांतील ब्रह्मवृंद धर्मशास्त्रातील चर्चेत भाग घेण्यासाठी सतराव्या व अठराव्या शतकामध्ये सावंतवाडीत येत असत. तेव्हा राजेबहाद्दर खेमसावंत तिसरे हे गादीवर होते. ब्रह्मवृंदामुळे लाखकामाची कला सावंतवाडीत येऊन पोचली होती. विशेषत्वाने, त्या कलेची शैली आकृतिबंधात्मक रंगकामाच्या बाबतीत तेथे रुजली आणि पुढे, ती विकसित झाली. सावंतवाडीच्या राजघराण्याने सतराव्या शतकात या लाखकामाच्या कलेला राजाश्रय दिला; तसाच, ‘गंजिफा’ खेळासही.  ‘दशावतारी गंजिफा’ ब्रिटिश म्युझियम, लंडन येथे शतकापूर्वी जाऊन पोचला होता! गंजिफा या कलाप्रकाराच्या चित्रशाळा अठराव्या व एकोणिसाव्या शतकात सावंतवाडीत होत्या. त्यामध्ये कै. नारायण केळकर व कै. विष्णू म्हापसेकर यांच्या चित्रशाळा विशेष प्रसिद्ध होत्या. त्या चित्रशाळांमधून ‘गंजिफा संच’ मोगल सम्राटापासून ते पेशवे दरबारापर्यंत भेटीदाखल सन्मानपूर्वक पाठवल्याच्या नोंदी आढळतात. दशावतारी गंजिफाबरोबर एकशेचव्वेचाळीस  पानांचा राशी गंजिफा, नवग्रह गंजिफा, बाराखडी गंजिफा हे तेथील वैशिष्ट्य...♍

गंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম