दिवसभर फ्रेश राहायचं असेल तर हे करा.

 तुम्हाला जर दिवसभर फ्रेश राहायचं असेल तर हे  करा.. 


.        दि. १३  आॅगष्ट २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/34gOPuf
   सकाळी असलेला फ्रेशपणा दिवसभर टिकवून ठेवणं हे थोडं कठीण आहे पण अशक्य नाही ,त्यासाठी काही सवयी लावाव्या लागतील . कारण की प्रत्येकाला किमान सहा ते आठ तास झोपेची आवश्यकता असते आणि तीसुद्धा शांत झोप हवी असते. काही लोकांना रात्री उशिरा झोप लागते आणि मग ते सकाळी उशिरा उठतात. काही लोकांना सकाळी लवकर जाग येते. रात्रभर झोप घेऊनही ताजेतवाने वाटत नाही. झोप झालीच नाही असे वाटते.

काही लोकांना झोपेत जास्त स्वप्न पडतात. त्यामुळे झोप झाली नाही असे वाटते. काही लोकांना रात्री चार-पाच वेळा जाग येते. परिणामी त्यांची झोप व्यवस्थित होत नाही. त्यांना असे वाटते की आपण रात्रभर जागेच होतो.  ज्यांना शांत झोप येत नाही, त्यांना अनेक शारीरिक आजार होऊ शकतात. झोप न लागणे हे मानसिक आजाराचे प्रथम लक्षण आहे. रात्री शांत झोप झाली तर आपण दिवसभर चांगले काम करू शकतो. बघूया शांत झोप लागण्याचे आणि पर्यायाने फ्रेश राहण्याचे १६ राजमार्ग
♦रात्री झोपेची वेळ नियमित ठेवा. कधी १० वाजता तर कधी १२ वाजता झोपलो असे करू नका.
♦झोपेच्या दोन तास अगोदर मोबाइल, टीव्ही, कम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर काम करू नका.
♦व्हॉटस्अ‍ॅप, इंटरनेट, फेसबुक, यूट्युब, ट्विटर, लिन्क्डइन सारख्या सोशल मीडियावर रात्री १० वाजतानंतर काम करू नका.

तुम्हाला जर दिवसभर फ्रेश राहायचं असेल तर हे  करा..

♦झोपेच्या तीन तास अगोदर आपले रात्रीचे जेवण करा आणि जेवणामध्ये गोड टाळा. गोड खाण्यामुळे इन्शुलिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे शांत झोप लागत नाही.
♦कॉफी, चहासारखे उत्तेजित द्रवपदार्थ दुपारी ४ नंतर घेऊ नका. चहा कॉफी अ‍ॅड्रेनीलचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे झोप येत नाही.
♦दररोज सकाळी अर्धा तास घाम येईल एवढा व्यायाम करा.
♦दररोज किमान २० मिनिटे मेडिटेशन करा.
♦झोपेच्या आधी फळं खा. फळांमुळे मेल्याटोनिनचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे शांत झोप येते.
♦झोपेच्या अगोदर हलक्या-फुलक्या पुस्तकांचं वाचन करा किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करा.
♦तुमच्या पलंग आणि गादीचा उपयोग फक्त झोपेसाठीच व्हायला हवा. मेंदूला तशी सवय लागते.
♦झोपेच्या खोलीमध्ये शांतता हवी. टीव्ही, रेडिओसारखी उपकरणे नकोत. लोकांचा गजबजाट नको. भीतीदायक सिनेमा, सिरीयल्स, कुतूहल जागृत करणारे कार्यक्रम रात्री टाळा.
♦झोपण्याअगोदर डायरी लिहिण्याची सवय लावा. ज्यामध्ये आज काय साध्य केलं ते लिहा आणि उद्या काय करणार आहोत, याची यादी तयार करा. यामुळे डोक्यातील विचार कागदावर येतात आणि डोकं शांत राहतं.
♦झोपेआधी कोणाशी वादविवाद करू नका. भांडण करू नका.
♦काही लोकांना स्नान करून छान झोप लागते. हा प्रयत्न करून पाहावा.
♦झोपेच्या खोलीमध्ये मंद निळा दिवा सुरू ठेवावा.
♦गादीवर पडल्यावर स्वसंमोहन करा. स्वत:ला शांत झोपेच्या सूचना द्या.
*💫वरील सर्व उपाय करूनही शांत झोप येत नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकदम कमी झोप घेणे आणि जास्त झोप घेणे दोन्ही अपायकारक आहे*
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•
❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম