योद्ध्यांचे गाव

योद्ध्यांचे गाव



https://bit.ly/2PXMtcL
मु पो ...अपशिंगे मिलिटरी (सातारा).....
दुसऱ्या महायुद्धावेळी या गावातील तब्बल 46 सैनिक शहीद झाले होते

प्रत्येक घरातला किमान एक व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये .."500 वीर आर्मी मध्ये"

महाराष्ट्रामध्ये अपशिंगे नावाची अनेक गावे आहेत परंतु फक्त या गावाचे वेगळेपण म्हणजे आपल्या सैन्यामध्ये भरघोस योगदान दिल्यामुळे ब्रिटिशांनी या गावाचे नामकरण 'अपशिंगे मिलिटरी' असे केले आहे.सैन्यामध्ये भरती होऊन देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे हि महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातील लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील अपशिंगे-मिलिटरी येथील लोकांचा मुख्य व्यवसाय धान्य पिकवणे हा नसून सैनिक घडवणे हा आहे असे म्हटल्यास वावगे ठरवू नये. कारण कुटुंबातील अनेक पिढ्यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे..अपशिंगे मिलिटरी हे गाव सातारच्या दक्षिणेकडे 18 किमी वर वसलेले आहे. 850 घरे आणि अवघी 5800 लोकसंख्या, तरी देखील या गावाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती हि भारतीय सेनेत काम केलेली अथवा करत असलेली आहे.

जवळपास 400 वर्षापूर्वी वसलेल्या या गावाने अनेक वीरपुत्र या भारत देशाच्या रक्षणासाठी दिले आहेत. दुसऱ्या महायुद्धावेळी या गावातील तब्बल 46 सैनिक शहीद झाले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाला अनेक युद्धांना सामोरे जावे लागले त्या प्रत्येक युद्धामध्ये या गावातील सैनिकांनी आपले खूप मोठे योगदान दिले आहे. 1962 च्या चीन विरुद्धच्या युद्धात 4 जवान, 1965 च्या पाकिस्तान युद्धात 2 जवान आणि 1971 च्या पाकिस्तान युद्धात 1 जवान अशा या गावाच्या 7 वीरपुत्रांना देशासाठी लढताना वीरगती प्राप्त झाली.

सुभाषचंद्र बोस यांच्या 'अझादहिंद सेने'मध्ये अपशिंगे मिलिटरीचे चार शूर सैनिक सहभागी होते . इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते कि अपशिंगेची हि सैनिकी परंपरा छ. शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे. अपशिंग्याच्या वीर मावळ्यांनी शिवरायांच्या सैन्यासाठी आपल्या शौर्याची चमक दाखवली होती. "500 वीर आर्मी मध्ये" सध्याच्या ह्या घडीला गावातील किमान 500 लोकभारतीय सैन्यात आपली सेवा बजावत आहेत. गावात सैनिकी ट्रेनिंगची कोणतीही सोय उपलब्ध नसताना नवी पिढी या सैनिकांकडून मार्गदर्शन आणि प्रेरणा घेत असते..♍

योद्ध्यांचे गाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম