पाण्यातून रंग शोषून घेणारा अनोखा स्पंज

 पाण्यातून रंग शोषून घेणारा अनोखा स्पंज   


      पाण्याला आपल्या पूर्वजांनी ‘जीवन’ असे समर्पक नाव दिलेले आहे. मात्र, सध्याच्या औद्योगिकरण, प्रदूषणाच्या काळात हे ‘जीवन’च धोक्यात आले आहे. अनेक हानीकारक रसायने आणि रंग यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी आता एक असा स्पंज निर्माण केला आहे जो काही सेकंदांमध्येच रंगीत पाण्यातून हानीकारक रंग शोषून घेऊन पाणी स्वच्छ करू शकतो.

हा स्पंज लाकडाचा लगदा आणि धातूच्या तुकड्यांपासून बनवण्यात आला आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,  वैश्विक स्तरावर वस्त्र, खेळणी, कॉस्मेटिक आदी उद्योगांसाठी दरवर्षी सुमारे 70 कोटी किलोग्रॅम रंगांचा वापर केला जातो. निर्मितीच्या काळात रंगांचा दहावा हिस्सा व्यर्थच वाहून जातो. हे रंग असे आहेत जे जल शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतही वेगळे करता येत नाहीत. त्यामुळे पाण्यात मिसळून ते पर्यावरणाचा एक भाग बनून राहतात. त्यांच्यामुळे नदी, तळे आदी जलस्रोत प्रदूषित होतात. पाण्यातील रंगाचे थोडेसे प्रमाण जरी असले तरी ते सूर्याचा प्रकाश रोखू शकते. त्यामुळे वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि जलतंत्रावर दुष्परिणाम होतो. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या अँथनी डिकायरा यांनी सांगितले की, पाण्यातून सहजपणे रंग बाजूला करणारे एखादे उपकरण निकडीचे झाले होते. त्यानुसार हा स्पंज बनवण्यात आला आहे. संशोधकांनी वनस्पतींमधील सेल्युलोज आणि पॅलेडियम धातूचे मिश्रण केले. त्यामधून हा स्पंज बनवला जो 99 टक्के वायूने भरलेला आहे. तो पाण्याला आरपार जाऊ देतो व त्यामधील धातूचे कण रंग बाजूला करतात.

┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

पाण्यातून रंग शोषून घेणारा अनोखा स्पंज

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম