भरपेट जेवल्यानंतर का येते झोप ?
जेवणावर आडवा हात मारला की अनेकांना आडवे होण्याची इच्छा होतेच. दुपारच्या झोपेला आपल्याकडे ‘वामकुक्षी’ वगैरे गोंडस शब्द आहेत. मात्र, जेवल्यानंतर ही झोप हटकून का येते या खोलात आपण कधी शिरत नाही. संशोधकांनी याबाबतही संशोधन केलेले आहे. जेवल्यानंतर जी झोप येते तिला शास्त्रीय भाषेत ‘फूड कोमा’ असे म्हटले जाते.
____________________________
फूड कोमा अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये ट्रिप्टोफॅन हा एक प्रकार आहे. अधिक मांसाहारी जेवण जेवल्यानंतर ट्रिप्टोफॅनचा शरीरातील स्तर वाढतो. त्यामुळे झोप येऊ लागते. हे एक प्रकारचे अमिनो अॅसिड बनते. काही दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यावरही असेच होत असते. ज्या वेळी आपण भात आणि बटाट्याचे पदार्थ अधिक खातो त्यावेळी शरीरात सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. ते एक न्युरोट्रांसमिटर आहे आणि त्याचा स्त्राव सुरू झाला की लोक अधिक सुस्तावतात. जर एखादी व्यक्ती भाताबरोबर मांसाहारी पदार्थ खाते (उदा. बिर्याणी) तर ट्रिप्टोफॅन मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होते. हे हार्मोन शरीराला झोपण्याचे निर्देश देऊ लागते. जर माणूस झोपला नाही तर त्याचे मन बेचैन होऊन जाते! अधिक तळलेले, चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यावर शरीराला कार्बोहायड्रेटस् अधिक प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे मेंदूला झोपेचे सिग्नल्स मिळतात.
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
Tags
माहिती