घरासमोर म्हणे लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्री येत नाहीत

 घरासमोर म्हणे लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्री येत नाहीत 


 कोल्हापुर सांगली परिसरात दारोदारी दृश्य 


फेसबुक लिंक https://bit.ly/35puEw8
घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्री घराजवळ फिरकत नाहीत. तसेच घाण करत नाहीत अशी समजुत झाल्याने अनेकानी हा प्रयोग आपल्या घरासमोर सुरू केला आहे.खरा तर हा प्रयोग सुरूवातीस ज्या ठिकाणी बांधकामे चालु असतात ,तेथे पडलेल्या वाऌुच्या ढिगारयात सुरू झाला.नंतर एकाचे बघुन दुसरा मग तिसरा असे करत सगऌीकडे हे लोण पसरले.कोल्हापुर, सांगली,सातारा भागात काही नागरिकांनी आपल्या घरासमाेर एका प्लाॅस्टिकच्या बाटलीमध्ये लाल पाणी भरुन ठेवले आहे. यामुळे कुत्री येत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.भटक्‍या कुत्र्यांना रोखण्याचा उपाय म्हणून लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या दारात, परसात, गोठ्याच्या दारात ठेवण्याचा उपाय कर्णोपकर्णी सर्वत्र पोहोचला आहे.
लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरते, हा शोध किंवा निष्कर्ष कोणी काढला, याची कोणालाही माहिती नाही; पण एक बाटली घ्यायची, त्यात पाणी भरायचे, लाल रंग टाकायचा व ती बाटली दारात ठेवायची. त्याला काही खर्च येत नाही. त्यामागे काही दैवी चमत्कार नाही.,त्यामुळे करून बघायला तरी काय हरकत आहे, म्हणून हा लाल रंगाच्या पाण्याचा प्रयोग सर्वत्र सुरू आहे.

घरासमोर म्हणे लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्री येत नाहीत

पावसाळ्यातील दिवसांमध्ये श्वान, वराह व गाई शहरातील गल्लोगल्ली फिरताना आढळतात. हे प्राणी कुठेही लघुशंका किंवा शौचसुद्धा करतात. बरेचदा नागरिकांच्या घरापुढील रस्त्यावर किंवा आवारात हे प्राणी बसून आपल्या विधी उरकतात. घरापुढील आवार अस्वच्छ ही जनावरे करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांना हाकलून लावणेही इतके सोपे नसते; उलट ते अंगावर धावून जाण्याची शक्यता असते. त्यावर काही नागरिकांनी सोपा उपाय शोधला आहे. तो म्हणजे, घराच्या दरवाजावर लाल पाण्याची बॉटल लावून ठेवणे. ही लाल पाण्याची बॉटल पाहून हे प्राणी घरासमोर किंवा आवारात बसत नाही. एवढेच नव्हे तर लाल पाणी दिसल्यामुळे ते थांबतदेखील नसल्याचा समज नागरिकांनी करून घेतला आहे. या गैरसमजाला सर्वाधिक महिला आहारी गेल्या आहेत.
खरेतर ही चुकीची समजुत आहे.कुत्र्यांना कुठलाही रंग कळत नाही. त्यामुळे अशा प्रकारे बाटली ठेवल्याने कुठलाही फरक पडणार नाही. नागरिकांनी अशा कुठल्याही अफवेला बळी पडू नये.पण जेथे सुशिक्षित लोकच हे प्रकार करतात तेथे इतरांचे काय सांगावे .
🔹प्राणी हे कलर ब्लाईंड असल्याने त्यांना केवळ प्रत्येक गाेष्ट ही कृष्णधवल दिसते. त्यामुळे घरासमाेर अशी बाटली ठेवल्याने कुठलाही उपयाेग हाेत नसल्याचे मत अनेक पशुवेद्यकांनी व्यक्त केले आहे.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম