म्हणुन या गावात हनुमंताचा द्वेष करतात.

म्हणुन  या गावात हनुमंताचा द्वेष  करतात

.        📯 दि. १  सप्टेंबर  २०१८ 📯
फेसबुक लिंक https://bit.ly/3gOB2yQ
            हनुमान ह्यांना भगवान राम ह्यांचे सर्वात मोठे भक्त मानल्या जाते. तसेच हनुमान ह्यांचे देखील अनेक भक्त भारतातच नाही तर जगभरात आढळतात. कुठलीही समस्या संकट सामोरे आले की आपण संकट मोचन हनुमान ह्यांचीच आठवण केल्या जाते. पण आपल्याच भारतात एक असे गाव देखील आहे, जिथे आपल्या बजरंगबलीची पूजाअर्चा करणे तर दूरच राहिलं त्यांचं नावही घेणे वर्ज्य आहे. तसेच ह्या गावात लाल 
हनुमान ह्यांच्या बाबतच्या ह्या गावकऱ्यांच्या द्वेषाचा संबध हा रामायणाशी आहे. पण येथे का असं केलं जातं? का येथील लोकांच्या मनात हनुमानाबाबत एवढा राग आहे? का येथे लाल रंगाचा झेंडा लावला जात नाही? आज हेच सर्व आपण जाणून घेणार आहोत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,उत्तराखंड येथील जोशीमठ प्रखंड येथील जोशीमठ नीति मार्गावर द्रोणागिरी नावाचं एक गाव आहे. हेच आहे ते गाव ज्यांचा हनुमान ह्यांच्यावर द्वेष आहे. रामायण काळात हनुमान येथे आले होते. तेव्हा असं काही झालं होत ज्यामुळे हे गावकरी हनुमान ह्यांच्यावर रागावले आहेत. आणि त्या घटनेनंतर ह्या गावकऱ्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले.
रामायण काळात राम-रावण युद्धा दरम्यान जेव्हा लक्ष्मण मेघनाथच्या बाणाने बेशुद्ध झाले होते तेव्हा हनुमान ह्यांना संजीवनी बुटी आणण्याचे आदेश राम ह्यांनी दिले होते. द्रोणागिरी गावातील लोकांच्या मते हनुमान संजीवनी बुटीसाठी जो पर्वत उचलून घेऊन गेले होते तो पर्वत ह्याच गावात होता.
ज्या पर्वतावर संजीवनी बुटी होती येथील लोक त्या पर्वताची पूजा करायचे. ह्या गावात अशी मान्यता आहे की, ज्यावेळी हनुमान ही संजीवनी बुटी घ्यायला आले होते तेव्हा पर्वत देवता साधना करत होते.
अश्या परिस्थितीत हनुमान ह्यांना त्यांची साधना पूर्ण होण्याची वाट बघयला हवी होती. पण त्यांनी असं न करता त्यांनी पर्वत देवेतेची परवानगी न घेता पर्वताचा एक भाग स्वतःसोबत घेऊन गेले. ह्याप्रकारे हनुमान ह्यांनी पर्वत देवतेची साधना भंग केली. गावकऱ्यांच्या मते हनुमान पर्वतच जो भाग उचलून आपल्यासोबत घेऊन गेले, तो पर्वत देवतेचा उजवा हात होता.
ह्या गावात अशी मान्यता आहे की, पर्वत देवतेचा एक हात नसल्याने ते आजही त्याचे कष्ट भोगत आहेत. तसेच त्यांच्या उजव्या हातातून आजही रक्त निघत असतं अशी त्यांची मान्यता आहे. ह्याच घटनेमुळे येथील लोक हनुमान ह्यांच्यावर रागावलेले आहेत. एवढं की येथे त्याचं नावही घेतल्या जात नाही. तसेच येथे लाल रंगाचे झेंडे लावण्यास देखील मनाई आहे. कारण लाल रंग हा हनुमान ह्याचं प्रतिक मानल्या जाते.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

म्हणुन  या गावात हनुमंताचा द्वेष  करतात. ,
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম