उंटाचे दूध मधुमेहावर रामबाण?

उंटाचे दूध मधुमेहावर रामबाण

फेसबुक लिंक https://bit.ly/34VMiHD
 जयपूर :उंटीणीचे (खरे तर मराठीत मादी उंटाला ‘सांडणी’ असे म्हटले जाते!) दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे हे पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आधुनिक काळात तर अनेक रोगांवर ते गुणकारी असल्याचे म्हटले जात आहे. मधुमेहावर तर ते रामबाण उपाय असल्याचे म्हटले जाते. राजस्थानमधील एका माणसाने निव्वळ उंटाच्या दुधामुळे आपण मधुमेहातून मुक्त झाल्याचा दावा केला आहे.
टोंक नावाच्या गावात राहणार्या हनुमान बली नावाचा हा माणूस तीन वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त होता. हजारो रुपये उपचाराला खर्च केल्यावर एका मित्राच्या सल्ल्याने त्याने उंटाचे दूध पिणे सुरू केले. केवळ एक महिन्यात आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित झाले आणि नंतर मधुमेह पूर्ण बरा झाला असा त्याचा दावा आहे. सध्या आपण ठणठणीत असून आधीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि सक्रिय झालो आहे, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे कळण्यास मार्ग नाही, पण उंटाचे दूध याबाबतीत गुणकारी असल्याचे अनेक दावे यापूर्वीही झाले आहेत. बिकानेरच्या राष्ट्रीय उष्ट्र (उंट!) अनुसंधान केंद्राने तर मानसिक आरोग्य, बौद्धिक वाढ यासाठीही उंटाचे दूध गुणकारी असल्याचे म्हटले आहे.♍
उंटाच्या दुधाचे दररोज सेवन केल्यामुळे मेंदूचा चांगला विकास होतो. लहान मुलांना आणि खास करून मंदबुद्धीच्या मुलांसाठी याचा अधिक फायदा होतो. उंटाचं दूध लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवतात.
इतर आजारांबरोबरच त्वचेचा आजार दूर करण्यासाठी या उंटाच्या दुधाचा सर्वाधिक फायदा होतो. उंटाच्या दुधात अल्फा हायड्रोक्सिल अम्ल पदार्थ असते. यामुळे त्वचा सर्वाधिक ग्लो होते. अनेक सौंदर्याशी संबंधित असलेल्या प्रोडक्टमध्ये उंटाचे दूध असते.या दुधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आरोग्य चांगलं राहतं. उंटिणीच्या दुधात जास्त प्रोटिन्स असतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.कुपोषित बालकांसाठी उंटिणीचं दूध पौष्टिक आहे.
उंटाचे दूध मधुमेहावर रामबाण?
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম