अजब रेल्वे स्थानक - अर्धे महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये आहे

 अजब रेल्वे स्थानक - अर्धे महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये आहे 


           तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर रेल्वे मास्तरचे कार्यालय गुजरात मध्ये 

    
.        दि. ४ सप्टेंबर २०१९

फेसबुक लिंकhttps://bit.ly/32YS1tF
        एखादी नदी, डोंगर रांगा, जंगल आदींचा अर्धा भाग दोन वेगवेगळ्या राज्यांत विभागला गेल्याचे अनेकदा ऐकिवात आहे. परंतु, चक्क एका रेल्वे स्थानकाचा काही भाग महाराष्ट्रात तर काही भाग गुजरातमध्ये आहे. या स्थानकावरील एक बाक असा आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, तर उर्वरित अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. त्यामुऴे हे एक आश्चर्यच आहे.
'नवापूर' असे या रेल्वे स्थानकाचे नाव आहे. हे स्थानक महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात आहे

हे स्थानक महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर येत असल्याने त्याचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या सीमेत तर अर्धा गुजरातच्या सीमेत आहे.जेव्हा नवापूर स्टेशन बांधले गेले तेव्हा महाराष्ट्र व गुजरातचे विभाजन नव्हते. त्यावेळी नवापूर स्टेशन संयुक्त मुंबई प्रांताच्या अखत्यारीत होते. जेव्हा मुंबई प्रांताचे विभाजन झाले तेव्हा नवापूर स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांत विभागले गेले. तेव्हापासून या स्थानकाची स्वतःची वेगळी ओळख आहे. या स्थानकातील तिकीट खिडकी महाराष्ट्रामध्ये आहे, तर स्टेशन मास्तरांचे ऑफिस गुजरातमध्ये आहे. नवापूर स्थानकावर 4 वेगवेगळ्या भाषांमधून घोषणा होत असतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या स्थानकातील तिकीट खिडकी, रेल्वे पोलीस स्थानक, केटरिंग नंदुरबारमधील नवापूर गावात येतात. तसेच स्टेशन मास्तरचे कार्यालय, वेटिंग रूम, पाण्याची टाकी आणि शौचालय गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यामध्ये येते. विशेष म्हणजे या स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा अर्धा भाग गुजरातमध्ये, तर अर्धा भाग महाराष्ट्रात आहे. अनेकदा रेल्वे स्थानकात होणाऱ्या अपघातांवरून दोन्ही राज्याच्या पोलीस व्यवस्थेत कायम गोंधळ निर्माण होतो.
जरी नवापूर स्थानक हे दोन राज्यांत असणारे स्थानक असले तरी भारतातील ते असे एकमेव स्थानक नाहीय. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सिमेवरही भवानी मंडी नावाचे स्थानक आहे. या स्थानकाचा अर्धाभाग राजस्थानमध्ये आहे तर अर्धा मध्य प्रदेशमध्ये.
____________________________




थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম