भेंडी झाली लाल-जांभळी !

 भेंडी झाली लाल-जांभळी! 


.        दि. २३ सप्टेंबर २०२० 

फेसबुक लिंक https://bit.ly/3615Yui
        वाराणसी :: उत्तर प्रदेशात वाराणसी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च म्हणजेच ‘आयआयव्हीआर’ने आता लाल-जांभळ्या रंगाच्या भेंडीची प्रजाती विकसित केली आहे. 23 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर आता या संस्थेला याबाबतचे यश मिळाले आहे. या नव्या प्रजातीला ‘काशी लालिमा’ असे नाव देण्यात आले आहे. लाल रंगाची ही भेंडी अँटी ऑक्सिडंट, लोह आणि कॅल्शियमसह अनेक पोषक घटकांनी यूक्‍त आहे

भेंडी झाली लाल-जांभळी!


लाल रंगाची भेंडी आतापर्यंत केवळ पाश्‍चिमात्य देशांमध्येच पाहायला मिळत होती. भारतात तिकडूनच अशी भेंडी आयात केली जात असे. तिच्या वेगवेगळ्या प्रजातींची किंमत शंभर ते 500 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. आता भारतीय शेतकरीही लवकरच तिचे उत्पादन घेऊ शकतील. डिसेंबरपासून संस्थेमध्ये या भेंडीचे बीज शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. पोषक घटक असलेल्या या भेंडीच्या उत्पादनाचा आर्थिक लाभ शेतकर्‍यांना तर मिळेलच; पण ग्राहकांनाही या भेंडीच्या सेवनाने आरोग्य लाभ मिळेल. संस्थेचे माजी संचालक डॉ. बीजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली लाल भेंडीच्या प्रजातीवर 1995-96 मध्ये काम सुरू करण्यात आले होते. या संशोधनात डॉ. एस. के. सानवाल, डॉ. जी.पी. मिश्रा आणि तंत्रज्ञान सहायक सुभाष चंद्र यांनी योगदान दिले. या भेंडीची लांबी 11 ते 14 सेंटीमीटर आणि व्यास 1.5 ते 1.6 सेंटीमीटर आहे. 
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম