भाड्याची सायकल

 भाड्याची सायकल

फेसबुक लिंक https://bit.ly/32V4jEo
 नुकताचं चौथीतुन पाचवीत गेलो होतो. १९८५-८६ चा काळ होता तो...गल्लोगल्ली सायकल कंपनी असायच्या. तेथे तासावर भाडयाने सायकल मिळायची.लहान मुलाांसाठी पण लहान सायकली असायच्या. त्यावेळेस आम्ही मुलं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...ही सायकल भाडयाने आणायला घरचे लोक पैसे देताना का-कु करायचे.मग घरची हलकीफुलकी कामे करून त्यचे
ब मन वळवायला लागायचे. सायकल दुकानात लहान मुलाांसाठी एक किंवा दोन सायकल असायची. बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा.
भाडे जेमतेम ५० पैसे तास होतं.
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा.घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...

भाड्याची सायकल

👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे.

● जसे पंक्चर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी...
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे. 
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा  म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं...
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे...
एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली ,
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं यातचं अर्धी एनर्जी वाया जायचीआणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक...
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडघे फुटुन येशील...
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो...
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं...
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला..
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,नंतर सिंगल, डबल,  हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो...
खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे पण आता ते दिवस नाही...
तो आनंद नाही.... 
आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या  मुलांच्या सायकल वर 🚲 नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकल ची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या बाईक ला पण येणार नाही... 🏍

गेले ते दिवस...🍁
राहिल्या त्या आठवणी......🍂

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম